
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या (Central Government) माध्यमातून विविध कामांचे लोकार्पण (Dedication of works) केले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील 2390 कोटी रूपयांच्या 7 महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण (Dedication of highway projects) तसेच 70 कोटी रुपयांच्या 9 विकासकामांचे भूमिपूजन (Bhumi Pujan) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी (Union Road Transport Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते उद्या दि.22 रोजी 5.45 वाजता जळगावातील शिवतीर्थ मैदानावर करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी हे जळगावात येणार असून त्यांचा दौरा प्राप्त झाला आहे.दि.22 रोजी दुपारी 4.10 वाजता जळगाव विमानतळावर (Jalgaon Airport) आगमन होईल. सांयकाळी 5 ते 5.30 वाजेपर्यंत प्रेसिडेंट कॉटेज येथे भाजपच्या (bjp) कार्यकत्यार्ंबरोबर संवाद साधतील. सांयकाळी 5.45 वाजता शिवतीर्थ मैदानावर महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण सोहळा तर सांयकाळी 7 .15 वाजता जळगाव विमानतळावरुन विशेष विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील.
जळगावात जय्यत तयारी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध कामांचे लोकार्पण केले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील 2390 कोटी रूपयांच्या 7 महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण (Dedication of highway projects) तसेच 70 कोटी रुपयांच्या 9 विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.त्यासाठी शिवतीर्थ मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या महामार्गाचे लोकार्पण
या कार्यक्रमात तरसोद ते चिखली महामार्ग चौपदरीकरण 1427 कोटी, अमळनेर-चोपडा रस्ता 31 कोटी, बोदवड-मुक्ताईनगर-मलकापूर रस्ता 178 कोटी, बोढरे ते धुळे रस्ता 1007 कोटी, जळगाव-भडगाव, औरंगाबाद-सिल्लोड-जळगाव, पहुर-जामनेर-बोदवड, अंकलेश्वर बर्हाणपूर महामार्ग यासह विविध रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण ना. गडकरींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्र्यासह राज्यातील भाजपाचे नेते, राज्यातील मंत्री देखिल उपस्थित राहणार आहे. महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण तसेच विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन खासदार उन्मेश पाटील यांनी केले आहे.