पाचोरा-भडगाव कृउबास वर युतीचा झेंडा

आमदार किशोर पाटील यांनी गड राखला,भाजप पुरस्कृत स्वतंत्र पॅनल १६ जागेंवर पराभूत
पाचोरा-भडगाव  कृउबास वर युतीचा झेंडा

पाचोरा Pachora प्रतिनीधी

पाचोरा—भडगाव कृषी उत्पन्न बाजार समीती (Pachora—Bhadgaon Agriculture Produce Market Committee) निवडणुक मतमोजणी (Election Counting)  जारगाव शिवारातील  रामदेव लॉन्स येथे पार पडली.कृउबास च्या १८ जागां साठी आमदार किशोर पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल, (Farmer Development Panel of MLA Kishore Patil,) माजी आमदार दिलीप वाघ, वैशालिताई सुर्यवंशी ,राष्ट्रीय काँग्रेसचे महाविकास आघाडी पॅनल आणि भाजप पुरस्कृत स्वतंत्र शेतकरी सहकारी पॅनल यांच्यात तिरंगी लढत झाली. मतमोजणीत सुरुवातीला महाविकास आघाडी पॅनल ९ जागांवर बहुमताच्या वाटेवर होते.पण मोजणीच्या कलाटणी झाल्याने चर जागेंवर असलेले आमदारांचे पॅनल अंतिम टप्प्यात ९ जागेवर तर महाविकास आघाडीचे पॅनल ७ जागेवर आणि प्रचारात प्रचंड गाजावाजा करणारे भाजप पुरस्कृत अमोल शिंदे यांचे पॅनल तीन नंबरवर  फेकले जाऊन फक्त २ जागेवर थांबले.  विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी एकतर्फी विजय (One sided victory) मिळवत जिल्ह्यात गड राखला. 

पाचोरा-भडगाव  कृउबास वर युतीचा झेंडा
धुळे-दादर त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वेला सुरवात

राष्ट्रवादी काॅग्रेसचे माजी आमदार दिलिप वाघ,उबाठा नेत्या वैशाली सुर्यशी व काॅंग्रेस च्या पॅनलला मतमोजणीत गणित बिघडल्याने समितीच्या सत्तेने दोन मतांनी हुलकावणी दिली. तर आजी-माजी आमदारांच्या राजकारणाला अडसर असलेल्या अमोल शिंदे  गटाला १६ जागेंवर पराभव पत्करून घरातील फक्त २ जागा मिळाल्या. तिरंगी लढत झाल्याने कोणत्याही पॅनलला स्पष्ट बहुमताचा आकडा ओलांडता आला नाही. बाजार समितीत सत्ता स्थापनेच्या संघर्षात आजी माजी आमदार काय खेळी खेळतात याकडे लक्ष  लागले आहे. आमदारांनी संवादात सांगितले की, सभापती शिवसेना-भाजप युतीचाच असेल असे संकेत दिले

  जिल्ह्याचे लक्ष  असलेल्या या निवडणुकीत तिरंगी लढतील निकाल अटीतटीचा आणी उत्कंठा वाढविणारा होता.

पाचोरा-भडगाव  कृउबास वर युतीचा झेंडा
.... तर जळगाव शहर पुन्हा खड्ड्यात जाणार?

*सोसायटी सर्वसाधारण मतदार संघ*- विजयी उमेदवार

गणेश पाटिल (६०६ शिंदे सेना युती)

सतिष शिंदे (६०४ भाजपा)

प्रशांत पवार (५९७ माविआ)

प्रकाश पाटिल (५६९ शिंदेसेना युती)

शामकांत पाटिल (५२४ माविआ)

मनोज महाजन (४८४ माविआ)

विजय पाटील (४७६ माविआ)

सोसायटी सर्वसाधारण महिला राखिव मतदार संघ

  पुनम पाटिल (शिदेसेना -भाजप युतीं ६९७) तर दुसर्‍या जागेसाठी शिंदेसेना -युती गटाच्या अर्चना संजय पाटील व भाजपाच्या सिंधुताई शिंदे यांच्यात चुरशीची लढत झाली.यात काही मतांनी सिंधुताई शिंदे(५६८) विजयी झाल्या. 

सोसायटी इतर मागासवर्ग मतदार संघ

१ जागेसाठी माविआचे  उध्दव मराठे  ५७९ मतांनी विजयी झाले. यात विश्वासराव भौसले हे पराभुत झाले.या मतदार संघात १२७ मते अवैध ठरली.

सोसायटी भटक्या विमुक्त जाती जमाती एक जागेसाठी

माविआचे गणेश परदेशी व शिंदेसेना युतीचे लखिचंद पाटील यांच्यात लढत होउन लखिचंद पाटील हे ५४१ मतांनी विजयी झाले.या जागेच्या मतमोजणी आणी मतातिल फरकाबाबत गणेश परदेशी यांनी हरकत नोंदवली होती.त्यांना ५२७ मते मिळाली तर ९७ मते अवैध ठरली.

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघाच्या २ जागांमध्ये

माविआचे निलकंठ पाटील(४५९) व शिंदेसेना भाजपाचे सुनिल पाटिल(४३६) हे विजयी झाले.यात ६६ मते अवैध ठरली.*ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक* १ जागेवर मावीआचे शरद पाटिल यांना पराभुत करून शिंदेसेना युतीचे राहुल पाटील(४४९) हे  निवडून आले.१०५ मते अवैध ठरली.

ग्रामपंचायत अनुसुचित जाती जमाती एका जागेच्या लढतित शिंदेसेना युतीचे प्रकाश तांबे(४५०) हे विजयी झाले.यात ९७ मते अवैध ठरली.

व्यापारी मतदार संघाच्या दोन जागांवर माविआचे राहुल संघवी (१०२) व शिंदेसेना युतीचे मनोज सिसोदिया(१३४) यांनी बाजी मारली.५ मते अवैध ठरली.

विजया नंतर आमदारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून शहरात आनंद साजरा केला.

हमाल मापाडी मतदार संघाच्या एक जागेवर माविआचे समाधान हटकर हे विजयी असल्याची चर्चा असतांनाच शिंदेसेना युतीचे युसुफ पटेल  यांना १०९  तर समाधान हटकर यांना १०६ मते मिळाली ५ मते अवैध ठरली.

महिला राखिव जागेत सिंधुताई शिंदे व अर्चना पाटिल यांच्यातिल मतांचा फरक,भटक्या विमुक्त गटात गणेश परदेशी आणि लखीचंद राजपूत,तर हमाल मापाडी गटात युसुफ पटेल आणि समाधान हटकर यांच्या मतात घोळ असल्याच्या तक्रारी आणि फेरमत मोजणीची मागणी झाली असता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली. शेवटी मतमोजणी  ठिकाणी माजी आमदार दिलीप वाघ, आमदार किशोर पाटील यांनी या बाबतीत लक्ष घातले तरी  निवडणूक अधिकाऱ्यांनी फेरमत मोजणी फेटाळून लावत निर्णय जाहीर केला.

 मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नामदेव सुर्यवंशी, सहाय्यक राजेंद्र राऊत, हरिदास पाटील व कृउबा समितीचे सचिव बि बि बोरुडे यांनी कामकाज पाहिले. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली.पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनात सहा.पो. नि. राहुल मोरे, पीएसआय जितेंद्र वलटे  पो कॉ.राहुल बेहरे, गोपनीय विभागाचे नितीन सुर्यवंशी, सुनील पाटील आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com