अज्ञात वाहनाची ॲटोला जबर धडक; बावीस वर्षीय तरुणी जागीच ठार

अज्ञात वाहनाची ॲटोला जबर धडक; बावीस वर्षीय तरुणी जागीच ठार

मलकापुर Malkapur

मलकापुर येथुन मेहकर येथे परीक्षा देण्यासाठी निघालेल्या ॲटो (Auto) ला बुलढाणा रोडवर घुस्सर फाट्यानजीक समोरुन येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने (Unknown freight vehicle) जबर धडक (Beat) दिली या धडकेत ॲटोमधील बावीस वर्षीय तरुणी (young woman) जागीच ठार (killed) झाली तर ॲटोचालकासह दोघे जण गंभीर जखमी झाले असून जखमीवर बुलढाणा येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील हरीकिरण सोसायटी मधील प्रियंका दिनेश चोपडे,विनय सुनिल चोपडे हे यश पांडव यांच्या ॲटोत मेहकर ला परीक्षा देण्यासाठी आज सकाळी निघाले. घुस्सर फाट्यानजीक समोरुन येणाऱ्या भरधाव वाहनाने ॲटोला जबर धडक दिली या धडकेत ॲटोमधील बावीस वर्षीय तरुणी प्रियंका दिनेश चोपडे जागीच ठार झाली तर ॲटोचालक यश पांडव,विनय पांडव दोघे जण गंभीर जख्मी झाले,जखमीवर बुलढाणा येथील डॉ.लदद्ड यांच्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com