सुट्टीवर आलेल्या जळगावच्या जवानाचा दुदैवी मृत्यू
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
येथील सैन्य दलात (military) नोकरीवर असलेल्या जवान (jawan) सुट्टीवर घरी आलेला होता. घरातील जीना उतरतांना अचानक चक्कर येऊन पडल्याने या जवानाचा दुर्दैवी मृत्यू (death) झाल्याची घटना कांचन नगरात घडली आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल भरत सैंदाणे (वय-35) रा. असे मयत झालेल्या जवानाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनूसार विशाल सैंदाणे हा भारतीय सैन्य दलात आपले कर्तव्यावर होता. काही दिवसांपूर्वीच तो सुट्टीवर घरी कांचन नगर येथे आलेला होता. बुधवारी 15 मार्च रोजी रात्री 9 वाजता घराच्या पहिला मजल्याच्या जिन्यावरून खाली उतरत असताना विशालला अचानक चक्कर आले. त्यामुळे तो जिन्यावरून खाली कोसळला.
यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ शेजारी राहणार्या तरूणांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.
एकुलता एक मुलाचे अचानक अपघाती निधन झाल्याने आई-वडिलांवर व पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय शेलार करीत आहे. मयता जवानाच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि लहान मुलगा आणि मुलगी, बहिण असा परिवार आहे.
शासकीय इतमात अंत्यसंस्कार
मयत विशाल सैंदाणे यांच्यावर गुरूवार 16 मार्च रोजी दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.