
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
मेहरूण तलावात (Merun Lake) आज कलहंस (Goose duck) या विदेशी हिवाळी पाहुण्याचे दर्शन झाले. दक्षिण भारतात सहसा न आढळणारा किंवा फार क्वचित दिसणार्या कलहंस बदकाचे अनपेक्षित आणि गेल्या बारा वर्षानंतर प्रथम जळगाव जिल्ह्यात दर्शन (darshan) झाल्याची माहिती पक्षीमित्र (Bird friends) शिल्पा व राजेंद्र गाडगीळ (Shilpa and Rajendra Gadgil) यांनी दिली.
कलहंस बदक हा इंग्लंड आणि युरोप निवासी असून हिवाळ्यात स्थलांतर करून मुख्यत: उत्तर भारतात याचे थवे येतात. दक्षिण भारतात सहसा न आढळणारा किंवा फार क्वचित दिसणार्या कलहंस बदकाचे अनपेक्षित दर्शन झाल्याचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले. पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले की, आमच्या पक्षी निरीक्षणाच्या बारा वर्षाच्या कालावधीत जळगाव शहरात याची आम्ही प्रथमच नोंद केली.
हा हिवाळी पाहुणा पाकिस्तान ते मणिपूर, चिलका सरोवर, उडीसा या भागात मोठ्या प्रमाणात आढळतात. मध्यप्रदेश व महाराष्ट्रात यांचे दर्शन दुर्मिळ आहे. त्यांची वीण आईसल्यांड, स्कॅडिंनेविया तसेच स्कॉटलंड, बाल्कन्स आणि काळा समुद्र येथे असते.
स्थानिकांसह 35 नव्या पक्षींच्या जातींची नोंद
या सोबतच रेड डाटा लिस्टमध्ये असलेला तिरंदाज याचेही दर्शन झाले आहे. याशिवाय अटला बदक, लहान स्वरल, वारकरी, टिबुकली, हळदीकुंकू बदक, ठिपकेवली तुतारी, मोठा पाणकावळा, छोटा पाणकावळा, श्वेतकंठी आणि यासोबत काही स्थानिक पक्षी मिळून 35 जातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती राजेंद्र गाडगीळ यांनी दिली आहे.