अखेर तिढा सुटला ; ग.स.सोसायटीवर सहकारचा झेंडा

अध्यक्षपदी उदय पाटील तर उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे विजयी
अखेर तिढा सुटला ; ग.स.सोसायटीवर सहकारचा झेंडा

जळगाव - jalgaon

बहुचर्चित असलेल्या ग. स. सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी आज निवड होऊन अध्यक्षपदी सहकार गटाचे उदय पाटील तर उपाध्यक्षपदी रवींद्र सोनवणे यांची निवड करण्यात आली.

ग.स.सोसायटीच्या अध्यक्ष पदासाठी सहकार गटाचे उमेदवार उदय पाटील तर लोकसहकार-प्रगती शिक्षक सेना गटाचे उमेदवार रावसाहेब पाटील या दोघांनी अर्ज दाखल केले होते.

रावसाहेब पाटील यांना १० मते तर उदय पाटील यांना ११ मिळाल्याने विजयी झाले. तर उपाध्यक्ष पदासाठी सहकार गटाकडून रवींद्र सोनवणे तर लोकसहकार-प्रगती शिक्षक सेना गटाचे उमेदवार अनिल गायकवाड-पाटील या दोघांनी अर्ज दाखल केले.

त्यात अनिल गायकवाड-पाटील यांना १० मते तर रवींद्र सोनवणे यांना ११ मते मिळाल्याने विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी काम पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com