ट्रकच्या धडकेत पिंपळगावचे दोघे तरुण ठार

जाडगांव नजिक मोटार सायकल ट्रकचा अपघात
 ट्रकच्या धडकेत पिंपळगावचे दोघे तरुण ठार
अपघात | Accident

वरणगाव फॅक्टरी - (वार्ताहर )- Varangaon Factory

महामार्गावरील जाडगाव फाटया नजीक भरधाव वेगात ट्रकची मोटरसायकला धडक दिल्याने पिंपळगाव बुद्रुकचे दोघे तरुण ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडल्याने ट्रक चालकाविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत पोलिस सूत्रानी दिलेली माहिती अशी की , सोपान रमेश मावळे (वय १९), सचीन सुभाष मावळे (वय१८) राहणार पिंपळगाव बु , ता . भुसावळ हे दोघे तरुण मोटरसायकल क्रंमाक एम एच १४ सी टी ४७९८ वरिल चालक सचीन मावळे दीपनगर येथून घरी परत येत असतांना जाडगाव फाटयानजिक समोरुन येणारा ट्रक क्रंमाक एम एच १५ एफ व्ही १४१३ वरील चालक भरधाव वेगात चालवत समोरून येणाऱ्या मोटारसायकला धडक दिल्याने दोघे तरुण ठार झाले तर घटना स्थळावरून ट्रक चालक फरार झाला.

सचीन हा जागे वरच ठार झाला तर सोपान हा गंभीर जखमी झाल्याने नागरीकाच्या मदतीने त्याला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणत असतांना रस्त्यातच मृत्यू झाला .

Related Stories

No stories found.