
चाळीसगाव chalisgaon। प्रतिनिधी
तालुक्यातील ओझर येथे भरधाव कारने (car collision) मंदिराच्या ओट्यावर बसलेल्या तिघांना तसेच एका दुचाकीस्वार धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले, तर अन्य दोन (Two youths) जणांचा मृत्यू (died) झाला. हि घटना दि.24 रोजी दुपारी 2 वाजता घडली. संजय फकिरा मंजाळ (वय 40) व गोरख हरिश्चंद्र पवार (वय 38) अशी मृतांची नावे आहेत. तर सुधीर काशिनाथ चौधरी व दुचाकीस्वार युवराज फुला गोलाइत हे जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की संजय मंजाळ, गोरख पवार व सुधिर चौधरी हे ओझर येथे जुन्या बस स्टॅन्डजवळील देवीच्या मंदिराच्या ओट्यावर बसलेले होते. त्याचवेळी पातोंडा गावाकडून भरधाव येणारी टाटा नेक्सॉन कारने (एमएच.19-सी.यु. 5383) त्यांना उडविले. मंदीरावर बसलेले तिघे यात गंभीर जखमी झाले.
नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली, तसेच जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलवले. तेथे डॉक्टरांनी संजय मंजाळ व गोरख पवार यांना मृत घोषित केले. ग्रामस्थांनी कार चालकाला पकडले, त्याचे नाव सागर बाळासाहेब वाबळे (रा. मुंदखेडा) असे सागिंतले.
कारने या तिघांना उडविण्यापुर्वी युवराज गोलाइत या दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तो जखमी झाला. कार चालकाविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.