दोन तरुणांची गळफास घेवून आत्महत्या

दोन तरुणांची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांनी (Two youths) गळफास (committed suicide) घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. जयेश राजू साळवे (वय-22, रा. मयूर कॉलनी पिंप्राळा) व राहूल अर्जुन निकम (वय-28, रा. रामेश्वर कॉलनी मंगलपूरा मेहरुण) असे दोघ मयत तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद नगर व एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे.

शहरातील पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनीत जयेश राजू साळवे हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. जयेशने शनिवारी राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच जयेशचा मृतदेह खाली उतरवित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याची तपासणी केली असता, जयेशला मयत घोषीत केले. यावेळी जयेशच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच मनहेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.

तरुणांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट

गळफास घेवून आत्महत्या करणार्‍या दोघ तरुण तिशीतले आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

रामेश्वर कॉलनीतील तरुणाने संपविले जीवन

शहरातील रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरी भागात राहुल अर्जुन निकम हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शनिवारी राहुलने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच राहुलला रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी विनायक निकम यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास नितीन पाटील हे करीत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com