अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाहनचालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव । प्रतिनिधी । Jalgaon

हिंगोणा येथून दुचाकीने (Two-wheeler) जळगावात येत असतांना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत सागर विजय राणे (वय-30, रा. हिंगोणा ता. यावल ह. मु. जळगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील बुलेट शोरुम (Bullet showroom) समोर घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात (MIDC Police) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील हिंगोणा (Hingona) येथील ह. मु. जळगवातील रहिवासी सागर विजय राणे हा तरुण शहरात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहे. शनिवारी सायंकाळी सागर राणे हा कामानिमित्त आपल्या दुचाकीने हिंगोणा (Hingona) येथे घरी गेला होता. त्यानंतर रात्री दुचाकीने परत जळगावकडे येत असताना मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव-भुसावळ मार्गावरील बुलेट शोरूमच्या समोरून शहरात येत असतांना अज्ञात चारचाकी वाहनाने (unknown vehicle) दुचाकीला (Two-wheeler) जोरदार धडक दिली. या धडकेत सागर राणे हा तरुण जागीच ठार झाला.

पोलिसांची घटनास्थळी धाव

महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा (Panchnama) केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन (Postmortem) करून मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला.

एकुलता एक मुलगा गेल्याने दु:खाचा डोंगर

अपघातात मयत झालेला सागर हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे अपघातात निधन झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला असून आपला एकूलता एक मुलगा गेल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी पल्लवी, आईचा चारूलता, वडील विजय वासुदेव राणे असा परिवार आहे.

वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

दुचाकीला धडक दिल्याप्रकरणी शरद रमेश जावळे वय (वय-46) रा. रोझोदा ता. रावेर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com