
जळगाव - jalgaon
आज सकाळी जळगाव शहरातील (City of Jalgaon) द्वारका नगरजवळ महामार्गावर दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रक क्र. एम.एच.२९ एम.-०१४४ ने जोरदार (accident) धडक दिली. यात दुचाकीवरील महिलेच्या अंगावरून ट्रक (Truck) गेल्याने सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
रावेर (raver) तालुक्यातील रेंभोटा येथील कविता मुकेश कोळी (वय ३०) या त्यांचा भाचा अजय सोबत अजयसाठी (dharngaon) धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे मुलगी बघण्यासाठी जात होते. मात्र रस्त्याने जात असतानाचा जळगाव शहरात भीषण (accident) अपघात घडला. ट्रकने मागून धडक देताच कविता कोळी ह्या रस्त्यावर पडताच त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अजय सोनवणे हा गंभीर जखमी झाला असून त्यास खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका (police) पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी, बापू कोळी, प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीस तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.