दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, चार दुचाकी जप्त

चाळीसगाव पोलिसांची यशस्वी कामगिरी, शहरातील इतर दुचाकी चोरीची उकल होण्यची शक्यता
दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, चार दुचाकी जप्त

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

शहरातून गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरी जात होत्या. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनाल गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. याचा तपास करत असताना, शहरातील हिरापूर बायपा येथे चोरट येणार असल्याची गुप्त माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे. हि कारवाई रविवार दि,२९ रोजी करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या चोटर्‍यांकडून शहरातील दुचाकी चोरींच्या गुन्हांची उकल होण्याची शक्यता आहे.

दुचाकी चोरीच्या गुन्हांतील आरोपी शहरातील हिरापूर बायपासला येणार असल्याची शहर पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी सापळा रचून धनराज गजानन समकर (वय-१९ रा. चाळीसगाव) या आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा भाग ५ गुरन १७६/२०२१ भादवी कलम-३७९,३४ मधील होंडा शाईन हि मोटारसायकल त्याने चोरल्याची कबूली त्यांनी दिली.

सदर मोटारसायल हि नाशिक येथील यश सुधाकर इंदोलकर (२०) व यश नंदु कांबडे (१९) (दोन्ही रा. सामनगावरोड नाशिक) यांच्या साहाय्याने तेथेच लपवून ठेवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहर पोलिसांनी यश सुधाकर इंदोलकर (२०) व यश नंदु कांबडे (१९) दोन्ही रा. सामनगावरोड नाशिक यांना अटक केली आहे. त्यांची अधिक चौकशी केली असता, होंडा शाईन (एम.एच.१९ सीके ५५२३), हिरो होंडा स्पलेंडर (एम.एच.२० एक्यू २८१), होंडा ड्रीम युगा (एम.एच.१५ डीझेड ८५९५ ), होंडा हंक (एम.एच.१५ सीड्ब्लू ७७१० ) आदी दुचाकी चोरल्याची त्यांनी कबूली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आधिक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या आदेशानुसार सपोनि सचिन कापडणीस, सफौ अनिल अहिरे, पोना शैलेंद्र पाटील, पोना प्रविण संगेले, पोकॉं निलेश पाटील, पोकॉ दिपक पाटील, पोकॉ विनोद खैरनार, विजय पाटील, भुषण पाटील, शरद पाटील, प्रविण सपकाळे, पोकॉ अशोक मोरे, पोकॉ पवन पाटील व पोकॉ अमोल भोसले आदींच्या पथकने केली आहे. पुढील तपास सफौ अनिल अहिरे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.