
चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी
चाळीसगांव शहरातील हिरापुर रोड आदर्श नगर येथे एकाच रात्री शर्मा किराणा नावाचे व श्री गणेश मेडीकल दुकानाचे ( shops) शटर उचकवुन अज्ञात चोरट्यांनी (thieves)२७ हजार ५०० रुपये चोरुन नेले आहे. तर काही घरांच्या बाहेरील बुट व चप्पल देखील चोरी केल्याची माहिती प्राप्त झाही आहे. हि घटना दि.२३ रोजी रात्री ०९ ते दि. २४ रोजी पहाटे ०४ वाजेच्या दरम्यान घडली आहे. यामुळे शहरात पुन्हा चोरीचे सत्र सुरु झाले सिद्ध होत आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अज्ञता चोरट्याविरोधात गुन्हां दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ओमचंद हुकुमचंद शर्मा वय ३६ वर्षे धंदा किराणादुकान रा. हिरापुर रोड आदर्श नगर, ओमचंद शर्माच्या घराला लागुन शर्मा किराणा दुकान असून त्यांच्या दुकानाजवळच योगेश राजेद्र शिंदे यांचे श्री गणेश मेडीकल अँण्ड होलसेल दुकान ३ वर्षापासुन आहे. शर्मा हे दि.२३ रोजी दिवसभर पत्नी नुतन असे दुकानावर होते. त्यानंतर रात्री ०९.०० वाजेच्या सुमारास त्यांनी दुकानाला कुलुप लावुन ते घरी निघुन गेले. दि. २४/०१/२०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजेच्या सुमारास त्यांची आई विमलबाई यांना किराणा दुकानात आवाज आल्याने तिने शर्मा यांना आवाज दिला की, शर्मा हे लागलीच दुकानात आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकलेले दिसले. दुकानातील साहित्य हे अस्ताव्यस्त पडलेले होते, दुकानातील कपाट उघडे दिसले. तेव्हा त्यांनी दुकानातील पैशांचे ड्रावर पाहिले असता ते उघडे दिसले व त्यातील पैसे दिसले नाही.
त्यानतंर दुकानाचे बाहेर येवुन आजुबाजुला पाहीले असता दुकानाच्या बाजुला असलेले श्री गणेश मेडीकल अँण्ड होलसेल दुकानाचे देखील शटर उचकले होते. म्हणुन त्यांनी योगेश शिंदे यांना घटनेची माहीती दिली. त्यानंतर योगेश शिंदे हे दुकानात आले त्याच्या दुकानात जावुन पाहीले असता पैशांचे ड्रावर पाहिले असता ते उघडे दिसले व त्यातील रोख रक्कम ३५०० रुपये व मेडीकल मधील कागदपत्र असे चोरी झाले असल्याचे योगेश शिंदे यांच्या लक्षात आले. तेव्हा कोणीतरी अज्ञात इसमाने किराणा दुकानातील पैसे व योगेश शिंदे यांच्या मेडीकल मधील पैसे अस ऐकूण २७५०० रुपये चोरीस गेल्याची खात्री झाल्यानतंर शर्मा यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान शहरात वाढत्या चोरीच्या प्रमाणामुळे पोलिसांचा वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे.