वाघळी शिवारातून दोन चंदन चोरट्यांना अटक

ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
वाघळी शिवारातून दोन चंदन चोरट्यांना अटक

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील वाघळी गावाजवळील (Waghali Shivara) नाल्यात चंदनाचे लाकुड (sandalwood) तोंडताना दोघांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी (police) ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातून १२ हजार रुपये किमतीचे ५ किलो चंदनाच्या लाकड्याचे (Sandalwood) तुकडा जप्त करण्यात आहे. हि कारवाई दि.२३ रोजी करण्यात आली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां (crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वाघळी येथील संजय बळीराम भंगाळे यांच्या वाघळी शिवारातील शेताजवळ असलेल्या नाल्यातील चंदनाची झाडे (Sandalwood trees) तोडून दोन इसम चोरी (Theft) करत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक त्याठिकाणी पोहचले. त्या ठिकाणाहुन वजीर खान मेहमूद खान(३२) व असलम चॉंदखान दुलोद (२३) दोन्ही रा. कुंजखेडा ता.कन्नड, जि.औरंगाबाद यांना ताब्यात घेतले.

त्याच्या ताब्यातून हिरो कंपनीची मोटारसायकल (Motorcycle) ( क्र.एमएच-२७, एएस-१२०१) जप्त करुन, तपासणी केली असता, सिटच्या खाली कुर्‍हाड, दोन हाताने फिरवायच्या ड्रील मशीन, ड्रील मशीनला लावयाची लाकडी मुठ, एक कुदळी व छोटी कानस असे साहित्य मिळून आले. म्हणून ते चंदनचोर (Sandalwood thieves) असल्याची पक्की खात्री पोलिसाना झाली. त्यांच्या विरोधात संजय बळीराम भंगाळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सदर गुन्हांत अटक करुन त्यांची दि, २८ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली.

पोलीस कोठडीत पोलिसांनी आरोपी वजीर खान मेहमूद खान यांच्याकडून त्याने चोरलेल्या चंदनापैकी १२ हजार रुपये किमतीचा ५ किलो चंदनाचा तुकडा जप्त (Confiscated) केला. या गुन्हांत कन्नड तालुक्यातील इतर आरोपी निष्पन्न होण्याची दाट शक्यत आहे.

हि कारावाई पो.अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे, अपर पो.अधिक्षक रमेश चोपडे, पो.नि.संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहापो.नि. रमेश चव्हाण, पो.उप. लोकेश पवार, पोहेकॉ. दत्तात्रय धोंडू महाजन, पोना.जयंत लक्ष्मण सपकाळे, पोना.गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना.शांताराम सिताराम पवार आदिच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोना.संजय सपकाळे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.