जळगावात दहा हजारांची लाच घेतांना दोन आरटीओ एजंट जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगावात दहा हजारांची लाच घेतांना दोन आरटीओ एजंट जाळ्यात

जळगाव | jalgaon

प्रवासी बस हस्तांतरण (Passenger bus transfer) करण्याच्या मोबदल्यात दहा हजाराची (Ten thousand in return) लाचप्रकरणी (bribery case) जळगाव आरटीओ कार्यालयातील (Jalgaon RTO office) दोन आरटीओ एजंटाला (RTO agents) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Bribery Prevention Department) मंगळवारी रंगेहाथ अटक (Rangehath arrested) केली आहे.

शुभम राजेंद्र चौधरी वय २३ रा कोल्हे हिल्स, जिजाऊनगर जळगाव व राम भीमराव पाटील वय रा.३७ अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ जळगाव अशी अटकेतील दोघां संशयितांची नावे आहेत

जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रूक येथील तक्रारदाराने प्रवासी बस विकत घेतले असून ही बस तक्रारदार यांना त्यांच्या वडिलांच्या नावावर हस्तांतर करावयाची होती. या कामासाठी आरटीओ कार्यालयातील एजंट शुभम चौधरी व राम पाटील या दोघांनी तक्रारदाराला दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची खात्री व पडताळणी करून मंगळवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मग आरटीओ कार्यालयात सापळा रचून दहा हजारांची लाच घेताना एजंट शुभम चौधरी याला रंगेहाथ पकडले. तक्रारीनुसार शुभम चौधरी याचा साथीदार आरटीओ एजंट राम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे

पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, रवींद्र घुगे, शैला धनगर' मनोज जोशी, सुनील शिरसाठ , जनार्दन चौधरी प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख ,ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com