गुन्ह्यात मदतीसाठी ४ हजाराची लाच स्वीकारणारे दोन पोलीस जाळ्यात

Anti Corruption Bureau
Anti Corruption Bureau

चाळीसगाव Chalisgaon । प्रतिनिधी

तक्रारदार मुलीच्या (Complainant's daughter) दाखल गुन्ह्याच्या (Filed crime) कागदपत्रांमध्ये (documents) मदत करू असे सांगून, चार्जशीट लवकरात लवकर पाठवुन गुन्ह्यात मदत (Help in crime) करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडुन ४ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या (Accepting bribes) चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या दोन पोलिसांना (Two policemen) अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने (Anti-Corruption Bureau squad) रंगेहात अटक (arrested) केली आहे. ही कारवाई दि,28 रोजी सायंकाळी करण्यात आली. यामुळे चाळीसगाव पोलिसात एकच खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मुलीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सासरच्या मंडळी विरुद्ध गु.र.नं.0113/2022 भादवि कलम-४९८ अ व इतर कलमान्वये दि.19/03/3022 रोजी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करू असे सांगून चार्जशीट लवकरात लवकर पाठवुन गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे अनिल रामचंद्र अहीरे, वय-५२, (सहा.फौजदार, नेम-चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन वर्ग-३) यांनी पाच हजार रुपयांची लाच मागीतली.

या संबंधीची तक्रार, तक्रारदाराने अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाळ यांच्याकडे केली. अँटी करप्शन ब्युरो च्या पथकाने तक्रारीची खातरजमा करून, दिनांक 28 रोजी चाळीसगाव येथे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा लावला, आरोपी अनिल रामचंद्र अहीरे यांनी पंचासमक्ष 4 हजार रुपये लाचेची मागणी केली व शैलेष आत्माराम पाटील, वय-३८,(पोलीस नाईक, नेम-चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन वर्ग-३) यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.

सदर लाचेची रक्कम स्वीकारत असताना सिग्नल पाईंटजवळील एका चहाच्या टपरीवर दोघांनाही अँटीकरप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पीआय संजोग बच्छाव, पीआय.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ आदीच्या पथकांंने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com