४८ तासात लावला मोटारसायंकल चोरट्यांचा छडा

एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल जप्त
४८ तासात लावला मोटारसायंकल चोरट्यांचा छडा

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील (Rajgaon) राजगाव येथील आलिम कुतुबुद्दीन टकारी यांच्या मालकीची (Motorcycle) मोटारसायकल (क्र.एमएच १९, डीएच, ६२१७) घरासमोरुन चोरी गेली होती. याप्रकरणी चाळीसगाव (police) पोलिस स्टेशनला दि,४ रोजी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हांच्या चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासात तपास लावत, चोरट्याच्या मुसक्या आवळ्या आहेत. त्यांच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायंकल देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

४८ तासात लावला मोटारसायंकल चोरट्यांचा छडा
अखेर 'तुकडाबंदी'चे परिपत्रक खंडपीठात रद्दबातल

ग्रामीण पोलीसांनी गुन्हां दाखल झाल्यानतंर पो.नि.संजय ठेगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरिक्षक लोकेश पवार, सफो. राजेंद्र शंकरराव सांळुखे, पोहेकॉ. नितीन श्रीराम सोनवणे, शंकर दिनकर जंजाळे, मनोज भगवान पाटील, संदिप अशोक माने, संदिप पाटील आदिच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रतन दगडू अहिरे (४१ रा. रांजणगांव) यास ताब्यात घेतले, त्याची कसून चौकशी केली असता, त्याने मोटारसायंकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यात काळ्या रंगाची स्प्लेंडर (क्र. एम. एच. १९-डी. एक्स. ६२१७), हिरो होंडा कंपनीची पॅशनप्रो (क्र. एम. एच. १९-बी. झेड-७२८०), तसेच अन्य एक पॅशनप्रो (क्र. एम. एच. १९-सी.डी. ५२४६) अशा गाड्या आपण चोरी केल्याची कबूली रतन दगडू अहिरे यांनी दिली.

त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास पी. आय. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.नितीन श्रीराम सोनवणे करीत आहेत. हि कारवाई पो.अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. दरम्यान अवघ्या ४८ तासात चोरीचा छडा लावल्याबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com