दोन अल्पवयीन बहिणीना कारमधून पळवून नेले

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
दोन अल्पवयीन बहिणीना कारमधून पळवून नेले

चाळीसगाव Chalisgaon । प्रतिनिधी

तालुक्यातील राजंणगाव (Rajnangaon) येथे आईसोबत(mother) नातेवाईकाकडे आलेल्या सैेलु,जि.परभणी येथील 17 व 15 वर्षीय अल्पवयीन दोन बहिणाना (minor sisters) ओळखीच्याच तरुणांनी (Acquaintance youths) कारमध्ये बसवून पळवून(Abducted) नेल्याची घटना दिनांक 07/11/2022 रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस (police) स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनूसार सेलु, जि.परभणी येथे एक मुलगा व 17 व 15 वर्षीय मुलीचा संभाळ त्या मोलमजुरी करुन करतात. त्याचे पती सन 2007 पासून घरगती कारणामुळे विभक्त राहतात. त्याच गल्लीत संतोष कैलास सोनवणे व समीर पूर्ण नांव माहित नाही, त्यांना चांगल्याप्रकारे ओळखतात.

दिनांक 05/11/2022 रोजी पतीने मला लहान मुलीचे लग्न लावून द्यायचे सांगत होते. त्यावरुन दोघांमध्ये भांडण झाले होते. दिनांक 06/11/2022 रोजी आईसह, मामा, दोन्ही मुली व मुलगा, भाऊ असे माझा पुतण्या दशरथ सुरेश परदेशी यांचेकडे रांजणगांव ता. चाळीसगांव येथे भेटायला आलो होतो. त्या दिवशी आम्ही ज्या रेल्वेमध्ये होतो. त्याच रेलवे मध्ये संतोष सोनवणे व समीर हे सुध्दा होते.

दोन अल्पवयीन बहिणीना कारमधून पळवून नेले
जळगावच्या महापालिका आयुक्तांच्या कामकाजाचे लेखा परिक्षण व्हावे
दोन अल्पवयीन बहिणीना कारमधून पळवून नेले
अन् त्यांच्या संशोधनाच्या अविष्कारावर पारितोषिकांची उमटली मोहर

आम्ही रांजणगाव पोहचल्यानंतर त्या रात्रीजेवण वगैरे करुन झोपून गेलो. दुसर्‍या दिवशी दिनांक 07/11/2022 रोजी संकाळी 7.30 वाजेच्या सुमारास सर्वजण उठून घरात चहापाणी करीत होतो. त्याचवेळी माझ्या दोन्ही मुली माझ्या लहान पुतण्याची पत्नीला घेवून आम्ही दोघे मंदीरात जाऊन येतो असे सांगून घरातून गेल्या होत्या. परंतु अधा-पाऊणतास झाला मली घरी आल्या नाहीत, म्हणून माझा पूतण्या हा त्याना बघायला मंदिराकडे गेला, परंतू त्या मंदीराजवळ नव्हत्या नंतर तो मुलींना शोधायला शेतात सुध्दा गेला.

परंतु तिथेही त्या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर पुतण्या दशरथ हा घरी आला व त्याने मुली मिळून आल्या नाहीत, थोड्यावेळाने पुतण्या दशरथ याने त्याचा साडूचा मुलाला फोन केला व मुलीबद्दल विचारले तर त्याने सांगितले की, दोन्ही मुली पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसून निघून गेल्या आहेत.

दोन अल्पवयीन बहिणीना कारमधून पळवून नेले
गृहसचिवांसह तपासधिकार्‍यांना बजावली नोटीस

हि माहिती मिळाल्यानतंर मुलीच्या आईनेे लागलीच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला धाव घेतली. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन संतोष कैलास सोनवणे व समीर शेख पूर्ण नांव माहित नाही रा.सैलू. जि.परभणी यांच्या विरोधात भादवी कलम 363, 34 प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com