दोन दिवसात फुकट्या प्रवाशांकडून दोन लाख 98 हजारांचा दंड वसुल

दोन दिवसात फुकट्या प्रवाशांकडून दोन लाख 98 हजारांचा दंड वसुल

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

विभागीय रेल्वे प्रबंधक (Divisional Railway Manager) एस.एस.केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (तिकीट तपासणी) (Assistant Commercial Manager (Ticket Inspection)) आर.डी.क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली दि.17 व 18 मे 23 रोजी टिकिट तपासणी (Ticket Check) करण्यात आली.

दोन दिवसात फुकट्या प्रवाशांकडून दोन लाख 98 हजारांचा दंड वसुल
Big Breaking # 2000 रूपयांच्या नोटेबाबत आरबीआयने घेतला मोठा निर्णय... वाचाच अन्यथा होऊ शकते नुकसान

यात दि.17 रोजी चाळीसगाव-धुळे विभागाला 9 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 2 आरपीएफ कर्मचारी असलेल्या 96 प्रकरणांमधून 43 हजार 435 रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. तर दि. 18 रोजी 15 तिकीट तपासणी कर्मचारी आणि स्टेशन आरपीएफ कर्मचारी यांनी भुसावळ स्थानकावर तपासणी केली. त्यांनी भुसावळ स्थानकावर 314 प्रकरणे तयार केली आणि 2 लाख 35 हजार 550 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

दोन दिवसात फुकट्या प्रवाशांकडून दोन लाख 98 हजारांचा दंड वसुल
VISUAL STORY : गळ्यात नको ते घालून उर्वशी रौतेलाने केला कहर

या दोन दिवसात एकूण 2 लाख 98 हजार 985 रूपयांचा दंड स्वरूपात महसूल प्राप्त झाला. या कारवाईत सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) आर.डी.क्षीरसागर व सहायक वाणिज्य प्रबंधक (कोचिंग) हे स्वतः दोन दिवस तपासणी करत होते त्यांच्यासोबत विभागीय तिकीट तपासणी निरीक्षक श्री.पवार देखील उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com