धरणगावात धान्याचे दोन गोडाऊन सील

धरणगावात धान्याचे दोन गोडाऊन सील
USER

धरणगाव । Dharangaon

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या पथकाने बुधवारी दुपारी शहरातील दोन धान्य गोडाऊन छापेमारी करुन त्यांना सील केले आहेत. या कारवाईमुळे गावात व्यापारीमंडळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, शहरातील चोपडा रोडवरील दोन गोडाऊनवर आज दुपारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. गोडाऊनवर पथक धडकल्यानंतर त्यांना गोडाऊन परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेत धान्य आढळून आले. यानंतर गोडाऊनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आढळून आला.

पथकाने लागलीच गोडाऊन सील केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या पथकाने चोपडारोडवरीलच दुसर्‍या गोडाऊनवर धडक दिली. याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात धान्य आढळून आले. दोघं गोडाऊन सील करण्यात आले आहेत. दरम्यान, थेट जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई केल्यामुळे स्थानिक महसूल प्रशासनाला संबधित गोडाऊन बाबतीत माहिती नव्हती का? याबाबतची एकच चर्चा गावात रंगली आहे. कारण याआधीही यातील एका गोडाऊनवर तपासणी झाली होती.

गोडाऊन सील केल्यानंतर संबधितांना पावत्या दाखवून खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. असे समजले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com