
रावेर Raver। प्रतिनधी-
नगरपालिका निवडणूकीचे (municipal elections) सूप वाजले आहे. मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरु आहे.या घडामोडी घडत असतांना राज्यात सत्तांतर (Independence in the state) झाले असल्याने,पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष (Publicly appointed mayor) पदाचे वारे वाहू लागले आहे.राज्यात सत्ता परिवर्तनानंतर माजी मंत्री गिरीश महाजन (Former Minister Girish Mahajan) यांचे मंत्रीपद निश्चित मानले जात आहे. त्यानिमित्ताने रावेरातील मंडळीने त्यांची जामनेर येथे भेट घेवून (visiting),रावेरातील राजकीय घडामोडीबाबत चर्चा (Discussion on political developments) केली आहे. या भेटीत काय घडले,याबाबत गुप्तता पाळली जात असली तरी या भेटीत दोन माजी नगराध्यक्ष (Former mayor) सामील असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गत अडीच वर्षाचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. नव्याने राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमुळे अनेक बदल होत असतांना, नव्या मंत्रीमंडळात माजी मंत्री गिरीश महाजन यांची वर्णी लागणर असल्याने, त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी रावेरचे माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, शीतल पाटील यांनी भेट घेवून राजकीय परिस्थितीबाबत चर्चा घडवून आणल्याने रावेरात चर्चेला ऊत आला आहे.
याबाबत शीतल पाटील यांना विचारले असता,त्यांनी हि केवळ सदिच्छा भेट होती असे सांगून या भेटी बाबत होणार्या चर्चेवर पडदा टाकला आहे.
यावेळी अरुण शिंदे,दिलीप पाटील,विकास देशमुख,पंकज वाघ उपस्थित होते.
सर्वपक्षीय पॅनल बाबत खलबते
रावेर पालिकेत एका पक्षाची सत्ता स्थापन करणे कोणत्याही पक्षाला साध्य करता आले नसल्याने, सर्वपक्षीय पॅनलचा प्रयोग यशस्वी ठरत असल्याने,यावेळी सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार सर्वपक्षीय पॅनल करून निवडणूक लढवावी या पवित्र्यात आहे.त्या अनुषंगाने रावेरात बैठका झाल्या आहे.हि रणनीती ठरवण्यासाठी गिरीश महाजन यांची भेट घेतली असावी असा कयास व्यक्त होत आहे.