जिल्ह्यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

गोरखपुर तांडा येथील युवक डोगरी नदीत वाहिला : गुढ्याचा शेतकरी नाल्याच्या पुरात बेपत्ता
जिल्ह्यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

चाळीसगाव (Chalisgaon) - तालुक्यातील गोरखपुर तांडा (Gorakhpur Tanda) येथे तरुण किर्तनकार डोगरी नदीत गायीला पाणी पाण्यासाठी नदीवर गेला असता, त्याचा पाय घसरुन तो पाण्यात पडता, पाण्याच्या प्रवाहत वाहत जावून, त्यांचा बुडून मृत्यू झाला. हि दुदैवी घटना दि,29 रोजी संकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोमनाथ रामजी राठोड(25) रा.गोरखपुर तांडा(पिंपरखेड) हा दि,29 रोजी संकाळी लाईट नसल्याने आश्रमतील गायीला पाणी पाजण्यासाठी डोगरी नदीवर गेला होता. गायीला पाणी पाजत असताना, त्याच्या तोल जावून तो पाण्यात पडला. कालच डोगरी नदीला महापुर आल्यामुळे पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने तो पाण्यात पडताच दुर अंतरावर वाहत गेला. त्यात त्याला पोहता येत नसल्यामुळे, त्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याची बॉडी तब्बत तीन-चार तासानतंर मिळुन आली. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तिसर्‍या भावाचाही अपघाती मृत्यू

मयत सोमनाथ राठोड हा किर्तनाचे शिक्षण घेत होता. त्याच्या दोन भावांचा देखील यापूर्वी अपघाती मृत्यू झाला असून आता सोमनाथचा देखील अपघातील मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

गुढ्याचा शेतकरी नाल्याच्या पुरात बेपत्ता

गुढे, ता.भडगाव । गुढेगावासह परिसरात गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या सततधार व मुसळधार व जोरदार पावसामुळे सारा शेतशिवार पावसाने ओलाचिंब होऊन सर्वदूर पाऊसच पाऊस झाल्याने परिसरातील शेतशिवारातील सर्वच छोटे मोठे नाले, ओढे खळखळून वाहत होती दि . 28रोजी झालेला मुसळधार पावसामुळे सर्वत्र नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यातच दि. 28 रोजी दुपारी येथील शेतकरी भीमा रामा माळी (वय 61) हे आपल्या शेतात पिक परिस्थिती व शेतात काही नुकसान झाले आहे काय पाहणी करण्यासाठी गेले असता पथराड ते गुढे या शिवरस्तात असलेल्या नाल्याला अचानक आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नाला दुथडी भरून वाहत होता त्या पाण्याचा अंदाज न आल्याने भीमा माळी हे नाल्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेले सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या परिवाराचे सदस्य आणि ग्रामस्थांनी शोधा शोध केली असता ते शेताजवळील शिवरस्ताच्या पाण्यात मृत अवस्थेत आढळून आले.यांची खबर पोलिसांनी दिल्यानंतर रितसर पंचनामा करून त्यांची शवविच्छेदन करण्यात आले व त्यांचा गुढेगावी अत्यंसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली जावई भाऊ असा परिवार आहे ते गुढे येथील आदर्श भाजीपाला उत्पादक शेतकरी होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com