दोन हद्दपार आरोपी ताब्यात

दोन हद्दपार आरोपी ताब्यात

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

शहरातून हद्दपार असलेले (Deported) दोन्ही आरोपी (accused) शहरात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात (possession) घेण्यात आले. यातील एकाला न्यायालयिन कोठडी तर दुसर्‍याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक राजकुमार (Former corporator Raj Kumar) (उर्फ) सनी खरात (वय 20, आर. के. पॅलेस, समता नगर, भुसावळ) हा हद्दपारी कायद्याचे उल्लंघन करुन 30 रोजी पहाटे शहरातील साकरी फाटा परिसरातील सुशीलाबाई जैन यांच्या घराच्या गच्चीवर असल्याच्या माहितीवरुन बाजारपेठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेलते. त्याच्याजवळून तलवार जप्त करण्यात आली.

याबाबत बाजारपेठ पोलिसात पो. काँ. प्रशांत सोनार यांच्या फिर्यादीवरुन माजी नगरसेवक राजकुमार खरात याच्या विरुद्ध गु.र.नं. आर्म अ‍ॅक्ट. 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्या. के. एस. खंडारे यांच्या न्यायालयात हजर केले असता 12 दिवसांची पोलिस कोठडी (Police cell) सुनावण्यात आली. आरोपीतर्फे अ‍ॅड. सत्यनारायण पाल यांनी काम पाहिले. त्यांनी आरोपीच्या जामिनासाठी अर्ज केला असून 2 मे रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे. तपास हे. कॉ. नेव्हील बाटली करित आहे.

तर दुसर्‍या घटनेत, हद्दपार आरोपी विनोद लक्ष्मण चावरीया (Accused Vinod Laxman Chawria) (वय 40, रा. वाल्मिक नगर) हा हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करुन शहरात आला असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे त्याला शहरातील महामार्गावरील नाहाटा महाविद्यालयाजवळील उड्डाणपुला खाली बाजारपेठ पोलिसांनी (police) 30 रोजी पहाटे 12.30 वाजता ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध बाजारपेठ पोलिसात काँ. सचिन पोळ यांच्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 279/ 2022, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 142 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास बाजारपेठ पोलिस करित आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com