आकाशवाणी चौकातील दोन बंद घरे फोडली

आकाशवाणी चौकातील दोन बंद घरे फोडली

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आकाशवाणी चौक (Akashwani Chowk) परिसरातील दोन ठिकाणी चोरट्यांनी (thieves) बंद (Breaking) घर फोडून (closed house) घरातील सोन्याची अंगठी आणि रोकड असा एकुण दीड लाख रूपयांचा ऐवज लंपास (Lampas) केला आहे.

प्रसाद यशवंत काळे (वय-47) रा. आसोदा ता. जि.जळगाव ह.मु. गणेश नगर, आकाशवाणीच्या मागे जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते जैन कंपनीत नोकरीला आहे. दिवाळीनिमित्त घरातील सदस्य गावाला गेले होते.

प्रसाद काळे यांची कंपनीत रात्रपाळी असल्याने ते 7 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता घराला कुलूप लावून कामाला निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सोन्याची अंगठी आणि रोकड असा एकुण 70 हजाराच्या मुद्देमालाची चोरी केली. हा प्रकार 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता उघडकीला आला.

त्यानंतर त्यांच्या गल्लीत राहणारे सुभाष अरूण पाटील यांचे देखील बंद घरफोडून घरातील 80 हजार रूपयांचे दागिने लांबविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी प्रसाद काळे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com