लांबे वडगाव शिवारात बिबट्यासह दोन बछडे कॅमेर्‍यात झालेत कैद

वनविभागाने दिला सतर्कतेचा इशारा
लांबे वडगाव शिवारात बिबट्यासह दोन बछडे कॅमेर्‍यात झालेत कैद
File Photo

चाळीसगाव Chalisgaon । प्रतिनिधी

लांबे वडगाव शिवारात (Lambe Wadgaon Shivara) ऊसाच्या शेतात बिबट्याचे (leopard,) दोन बछडे (Two calves,) आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते एका सुरक्षीत ठिकाणी कॅरेटमध्ये बिबट्याचे बछडे ठेवले होते. काल रात्री बिबट्या येवून ते बछडे घेऊन गेले आहे.

लांबे वडगाव येथील प्रकाश निळकंठ पाटील यांचे चाळीसगाव धुळे महामार्गाला लागून शेत आहे. त्यांच्या शेतात ऊसतोड सुरू असतांना रविवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास मजुरांना बिबटयाचे दोन बछडे दिसून आले होते. याची माहिती तात्काळ वन विभागाला दिली. वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संजय चव्हाण, जी एस पिंजारी,बाळू शितोळे, श्रीराम राजपूत, भटू अहिरे, आर आर पाटील,एय एच जाधव,वाय के पाटील, संजय गायकवाड, राहूल मांडोळे यांनी शेतात धाव घेतली. त्यांना बिबट्याचे एक नर जातीचे नुकतेच जन्मलेले पिलू आढळून आले. तर दुसरा बिबट्या कुठेतरी गेला असावा वा मादी बिबट्याने ते नेले असावे अशी शक्यता व्यक्त केली गेली. वन विभागाने या शेतात दोन ट्रॅप कॅमेरे लावले व बछडे घेण्यासाठी मादी बिबट्या येवू शकते अशी शक्यता गृहीत धरून वन विभागाने त्या ठिकाणी लक्ष ठेवले होते.

ट्रॅप कॅमेर्‍यामध्ये दिसला मादी बिबट्या

दरम्यान ज्या उसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले होते त्या शेतात वन विभागाने दोन ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्या बिछड्याला कॅरेटमध्ये सुरक्षीत ठेवले होते. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास ट्रॅप कॅमेरा लावलेल्या व बछडा ठेवलेल्या ठिकाणी मादी बिबट्या येवून त्या बछड्याला घेऊन गेल्याचे कैद झाले आहे.

सतर्कतेचा इशारा

दरम्यान शेतात बिबट्या आढळून आल्याने नागरीकांनी, शेतकर्‍यानी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. शेतात जातांना एकट्याने न जाता पाच ते सहा जणांनी जावे. असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com