दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोघे दुचाकीस्वार जखमी

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोघे दुचाकीस्वार जखमी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दोन दुचाकींची (Two wheelers) समोरासमोर धडक (Hit) होवून अपघात (accident) झाल्याची घटना गणेश कॉलनीतील पेट्रोलपंपाजवळ घडली. या अपघातात दोघ दुचाकीस्वार जखमी (Bike rider injured) झाले असून त्यांच्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील रोहिदास देवीदास गोपाळ (वय-25) हे ह. मु. रिंगरोड येथे मित्रांसोबत वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री रोहीदास हा त्याचा मित्र अरुण पाटील याच्यासोबत (एमएच 19 बीएक्स 7898) क्रमांकाच्या दुचाकीने गणेश कॉलनीतील पेट्रोलपंपाकडून जात होते.

त्याचवेळी समोरून (एमएच 18 बीक्यू 6234) ने जोरदार धडक दिली. या धडकेत रोहिदास गोपाळ आणि अरूण पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी दुचाकीस्वार प्रविण सातवा गवळी रा. शंकरराव नगर, जळगाव याच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com