दोघ सहाय्यक निबंधक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पाच हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले; कार्यालयात खळबळ
दोघ सहाय्यक निबंधक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरात घर खरेदी केल्याने त्या घराची दप्तरी नोंद (Home docket record) करुन पावती देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच मागणारे (Bribe seekers) सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या (Assistant Registrar of Co-operative Societies) दोन अधिकार्‍यांना (two officers) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) रंगेहाथ (Caught red handed) पकडले. यात विजय सुरेशचंद्र गोसावी (वय- 54, रा. आशाबाबा नगर) व चेतन सुधाकर राणे (रा. गणेश कॉलनी) या दोघांना अटक केली. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ माजली आहे.

शहरातील 40 वर्षीय तक्रारदार यांनी सिंधी कॉलनी भागात घर खरेदी केले आहे. खरेदी केलेल्या घराची दप्तरी नोंद (Home docket record) करून त्याबाबतची ताबा पावती देण्याच्या मोबादल्यात उप निंबध सहकारी संस्थेत काम करणारे सहकार अधिकारी (Co-operative Officer) विजय सुरेशचंद्र गोसावी आणि सहाय्यक सहकार अधिकारी चेतन सुधारक राणे यांनी 5 हजाराची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Bribery Prevention Department) तक्रार केली. उपअधीक्षक शशिकांत पाटील व त्यांच्या पथकाने लाचेबाबत पडताळणी केली असता, त्यात पैशांची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले होते मात्र ते निष्पन्न झाले नाही.

सापळा लावून केली अटक

एसीबीच्या पथकाने सहकारी संस्थेच्या कार्यालयात सापळा (Trap in the office) लावून पंचा समक्ष दोघांना अटक (Arrested) केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, सफौ दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, रविंद्र घुगे, महिला पोहेकॉ. शैला धनगर, पोना मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com