बस स्थानकातून सत्तावीस ग्रॅम सोने व सात हजाराची रोकड लंपास

बस स्थानकातून सत्तावीस ग्रॅम सोने व सात हजाराची रोकड लंपास

पारोळा  Parola

तालुक्यातील म्हसवे येथे लग्नासाठी आलेल्या महिलेचे (woman) पाचोरा येथे परत जात असताना पारोळा बस स्थानकात (Parola Bus Station) गाडीत चढत असताना अज्ञात महिलांनी (unknown women) पर्स मधून सत्तावीस ग्रॅम सोने व सात हजार रुपयांचे रोकड लंपास (Lumpas) केल्याची घटना घडली आहे

पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील माहेर असलेल्या मनीषा मनोहर पाटील हे लग्न निमित्त म्हसवे येथे आले होते लग्न समारंभ आटोपून पुढील कार्यक्रमानिमित्त पाचोरा येथे जाण्यासाठी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास पारोळा बस स्थानकात आले असता बस स्थानकातील फलट क्रमांक तीनवर एम एच ४० एन ९०६५ ही बस पाचोरा जाण्यासाठी आली असता बसच्या दिशेने भरपूर गर्दी जमली

या गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यात असलेले पर्स मधून कोणीतरी अज्ञात महिलेने पर्सची चैन उघडून त्यामध्ये ठेवलेले 27 ग्रॅम सोन्याचे दागिने व सात हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली बस मध्ये जागा नसल्याने महिला बाजूला आल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली याप्रकरणी मनीषा पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्यान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com