वरणगावात गढुळ पाणी पुरवठा

नगरपरिषदेतर्फे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
वरणगावात गढुळ पाणी पुरवठा

वरणगाव, Varangaonता.भुसावळ । वार्ताहर

शहरात गढूळ पाणी पुरवठा (Turbid water supply) होत असल्यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने (Health endangered) नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु न.प. प्रशासन व कर्मचारी मात्र ढीम्म आहे.

वरणगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर तापी नदी (Tapi river) असून या नदीतून शहराला गेल्या 40 वर्षांपासून पाणीपुरवठा होत आहे. सुरुवातीला ग्रामपंचायत असताना सामूहिक पाणीपुरवठा योजनेमार्फत(Collective water supply scheme) गावाला पाणी पुरवठा नियमित होत होता. परंतु वरणगाव गावाचा विस्तार होऊन परिसर व लोकसंख्या वाढल्याने पाणीपुरवठा दोन दिवसआड सुरू झाला. पुन्हा तो नियमीत सुरू व्हावा म्हणून ग्रामपंचायत मार्फत 14 कोटींची पाणी पुरवठा योजना (Water supply scheme) मंजूर करण्यात येऊन ती कार्यान्वित करण्यात आली. परंतु सदर योजनेतुन शहराला पाणीपुरवठा नियमित होत नव्हता तो आठ दहा दिवसाआड होऊ लागला.

सामूहिक योजनेतून नियमित पाणीपुरवठा होत असताना 14 कोटींच्या योजनेतून मात्र आठ-दहा दिवसाआड पाणीपुरवठा व्हायला लागल्याने यात काही भ्रष्टाचार झाला अशी चर्चा वरणगाव शहरात सुरू झाली. त्यातच वरणगाव येथे नगरपरिषद स्थापन झाली. नगर परिषद मार्फत आजरोजी 25 कोटींची पाणी पुरवठा योजनेचे काम शहरात सुरू आहे. परंतु सदर काम हे अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर या 14 कोटींच्या योजनेतून शहरातील नागरिकांना मुबलक नियमित पाणीपुरवठा (Water supply) होईल असे त्यावेळेस असलेल्या सत्ताधार्‍यांकडून सांगण्यात आले होते.

परंतु गेल्या वर्षभरापासून शहरातील नागरिकांना पंधरा दिवस पाणीपुरवठा होत आहे. म्हणजे वरणगावकर यांची अवस्था पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे. हे कमी होते की काय? तर दि. 22 मे रोजी संपूर्ण वरणगाव शहरात अत्यंत गढूळ ( Turbid water supply) व आरोग्यास हानिकारक असे पाणी सोडण्यात आले.

त्यामुळे नगरपरिषद प्रशासन (Municipal administration) व पाणीपुरवठा कर्मचारी शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. या पाण्यामुळे शहरातील काही नागरिक आजारी पडल्याने अगोदरच कोरोनाने धास्तावलेल्या नागरिक या गढुळ पाण्यामुळे अजून कोणती साथ येती की काय म्हणून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांवर प्रशासनाकडून त्वरीत कारवाई करण्याची सुज्ञ नागरिकांकडून मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com