आग लावण्यापेक्षा ती विझवण्याचा प्रयत्न करा

डिवाएसपी सोमनाथ वाघचौरे यांचे शांतता समितीच्या बैठकीत आवाहन
आग लावण्यापेक्षा ती विझवण्याचा प्रयत्न करा

भुसावळ Bhusaval। प्रतिनिधी

काही विघ्नसंतोषी लोक समाजात तेढ निर्माण करत असतात, सोशल मिडियाच्या (Social media) माध्यमातून आग लावण्याच (start a fire) प्रयत्न करीत असतात, त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी आग (setting fire)लावण्यापेक्षा ती विझविण्याचा (extinguish it) प्रयत्न करावा, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे (Police Sub-Divisional Officer Somnath Waghchaure) यांनी केले. त्रिपुरा येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर शहरातील रिंग रोड परिसरातील शिखर संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी न.पा.चे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, मशिदीचे मौलाना सलमान मेमन, हाफीज रफीक, मुक्ती जावेद, अब्दुल हमीद नईमी, हाफीज गुलाम सरवर, अनिस अहमद किफायती, रेहान रजाक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. वाघचौरे यांनी अफवांना बळी न पडता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे सांगत मार्गदर्शन केले.

मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी जातीय सलोखा व कोरोना लसीकरणासंदर्भात गैरसमज न बाळगता सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन केले. यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी डॉ. कीर्ती फलटणकर, शिखर संस्थेचे सचिव रफीक शेख, मुजाहीद तडवी, मो. सैय्यद, शकील खान, सैय्यद रशीद, इम्रान शेख, अफताफ शेख, डॉ. तारीख, डॉ. इजहार, डॉ. इम्रान यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com