Accident ट्रक-एस.टी.बसचा अपघात ; प्रवाशी जखमी

Accident ट्रक-एस.टी.बसचा अपघात ; प्रवाशी जखमी

यावल - प्रतिनिधी Yaval

यावल तालुक्यातील भोरटेक (Bhortech) जवळ आज सकाळी ११.३० च्या सुमारास (Truck) ट्रक आणि (s t bus) एस.टी.बसचा (accident) अपघात झाला. यात आठ-दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना (Godavari Hospital) गोदावरी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे.

रावेर (raver) आगाराची एस.टी. बस क्र.एम.एच.४०-एन. ९०६३ जळगावहून रावेरला जात होती तर फैजपूर कडून भुसावळ कडे जाणारा ट्रक क्र. यु.पी.८०- सी.टी.७५३६ या दोघांची समोरा समोर धडक होऊन अपघात घडला

सदर हा अपघात रस्त्यावर विखुरलेले खडी व महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे झाल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले याच रस्त्यावर महिनाभरापूर्वी आंदलवाडी तालुका रावेर येथील एक महिला पुरुष ॲपे रिक्षा पलटी होऊन मयत झाले होते या जीवघेण्या खड्या बद्दल दैनिक देशदूत वेळोवेळी आवाज उठवला आहे परंतु कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागा बद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली

Related Stories

No stories found.