राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने दिली मिक्सर मशीनला धडक : पाच मजूर जखमी

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने दिली मिक्सर मशीनला धडक : पाच मजूर जखमी

मुक्ताईनगर -Muktainagar

तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक सहा वरील पिंपरीआक्काराऊत (Pimpri-Akkaraut) गावाजवळ प्रफुल्ल पेट्रोल पंपासमोर मुक्ताईनगर कडून मलकापूरकडे जाणाऱ्या मिक्सर मशीनला (mixer machine) ट्रक (Truck) ने मागून धडक दिल्याने (Hit from behind) त्यात पाच मजूर जखमी (laborer was injured) झाल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सुलेमान शहा सुलतान शहा वय 31 वर्षे राहणार अल्फला उर्दू हायस्कूल जुने गाव मुक्ताईनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सकाळी साडेसात वाजता घोडसगाव मलकापूर कडे स्लॅब टाकण्यासाठी मिक्सर मशीन घेऊन जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या टाटा ट्रक क्रमांक डब्ल्यू बी 61 बी 39 91 या वाहनाने मिक्सर मशीन ला जोरदार धडक दिली. त्यात मिक्सर मशीन व त्या वाहनात असलेले अरमान अली जब्बार अली सय्यद जुबेर सय्यद हैदर सय्यद अमीन सय्यद जमीर शेख तोफिक शेख रशीद फारुख अनिस खाटीक असे पाच मजूर सर्व राहणार जुने गाव मुक्ताईनगर जखमी झाले.

मिक्सर मशीनच्या वाहनाच्या नुकसानीस तसेच ट्रक पलटी झाला त्याच्या नुकसानीस व पाच मजुर जखमी झाले त्यासाठी जबाबदार असलेल्या ट्रकच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींना प्रथम मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यानंतर जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे घटनेतील ट्रक चालक असलेला आरोपी फरार आहे .

धडक देणारा 14 चाकी टाटा ट्रक मध्ये कांद्याची पोते होते. दरम्यान ही घटना समजल्यानंतर जखमींच्या नातेवाइकांनी तसेच नागरिकांनी घटनास्थळी तसेच मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.तपास हेड कॉन्स्टेबल संजीव पाटील करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com