ट्रकची आयशरला धडक ; मोटरसायकलसह दाम्पत्य अडकले

ट्रकची आयशरला धडक ; मोटरसायकलसह दाम्पत्य अडकले

पारोळा - प्रतिनिधी parola

येथील (S.T.Bus stand) बस स्थानकाजवळ (dhule) धुळे कडून पारोळ्याकडे येणारा (Truck) ट्रकने आयशरला समोरून जबर (accident) धडक देत आयशर मागे लोटत नेत असताना मागे येणारे मोटरसायकल वरील खडकी येथील कुटुंब आयशर मध्ये अडकून सुमारे पन्नास फूट मागे मोटरसायकल्सह लहान बालक व पुरुष महिला यांना फरफटत नेले.

मात्र त्यांचे नशीब बलवंत त्यांना किरकोळ जखमा झाल्यात त्याचवेळी ट्रक चालक हा ट्रकसह तेथून फरार झाला. यावेळी त्या ट्रकचालकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. अपघातात आयशरचा चुराडा झाला असून मोटर सायकल देखील पूर्ण ट्रक खाली अडकली होती.

या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाल्याने (police) पोलिस हेडकॉन्स्टेबल सत्यवान पवार, दीपक अहिरे, बापूराव पाटील यांनी वाहतूक बस स्थानकातून वळवून रस्त्यात असलेली आयशर क्रेनच्या साह्याने काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघात एवढा भीषण होता की बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com