
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-
चाळीसगाव औरंगाबाद (Aurangabad) महामार्गावरील कन्नड घाटात सोमवारी संकाळी स्टाईलने भरलेला ट्रक घाट चढत असतांना सदर ट्रक घाटातील खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रकमधील चालक व क्लीनर (Driver and cleaner) या दोघांचा मृत्यू झाला असून महामार्ग पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करुन दोघांना मृतावस्थेत बाहेर काढले.
कन्नड घाट (Kannad Ghat) जाम असतांना चाळीसगांवकडून औरंगाबादकडे जाणारा ट्रक नं. ( क्र.एम. एच. १८-ए. ए. ७४२३) हा घाटात कन्नडच्या बाजूने घाट संपण्यास अवघे २५ मिटर अंतर संपत असतांना घाटातील खोल दरीत कोसळला. ही घटना समजताच मदतकार्यास सुरुवात झाली. खोल दरीतून चालक व क्लीनरला (Driver and cleaner) शोधण्याच्या सुरुवात झाली.
महामार्ग पोलीस पी. एस. आय. सुनिल पयार, ए. एस. आर. अशोक चौधरी, प्रताप पाटील, पो. कॉ. येगेश बेलदार, विरेंद्रसिंग शिसोदे, सुनिल पाटील, श्रीकांत गायकवाड, कादर शेख तसेच कॉन्ट्रॅक्टर राज पुन्शी यांच्या संपूर्ण स्टापसह बापू चौधरी व पचोरीया आदिनी शर्थीचे प्रयत्न करुन चालक व क्लीनर दोघांना बाहेर काढले.
ट्रक चालक आसाराम अंबादास दाभाडे (वय-२३ रा. मुरुमखेडा जि. औरंगाबाद) हा मयत झाला तर क्लीनर शेख फयास शेख दरबार (वय-२८ रा. शेवगा जि. औरंगाबाद) यास बाहेर काढत असतांना त्याचाही मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.