साखपुड्यासाठी जाणार्‍या चाळीसगावच्या भावी नवरदेवासह दोघांचा मृत्यू

बुलढाण्यातील मेेहकर येथे लक्झरी बस व कारचा भीषण अपघात, मयतांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश
साखपुड्यासाठी जाणार्‍या चाळीसगावच्या भावी नवरदेवासह दोघांचा मृत्यू

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

बुलढाणातील (Buldhana) मेहकर येथे सारखपुड्यासाठी जाणार्‍या (chalisgaon) चाळीसगावच भावी नवरदेवासह दोन जण कार व लक्झरी बस भिषण (accident) अपघातात ठार झाले आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मयताचे भाव नवरदेवाच्या भावाचाही समावेश आहे, ही घटना मध्यरात्री घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

चाळीसगाव कोर्टात (Chalisgaon Court) वकिलांकडे कारकूणचे काम करणार योगश विसपुते , त्यांचा भाऊ विशाल विसपुते, आणि सांगवी येथील इंदल चव्हाण व इतर दोन जण, योगश विसपुते यांच्या साखरपुड्यासाठी मेहुकर येथे (Alto car) अल्टो कारने जात असताना, समोरुन येणार्‍या लक्झरी बसने (Luxury bus) कारला जोरदार धडक दिली. यात विशाल विसपुते, त्याचा भाऊ आणि सांगवी येथील इंदल चव्हाण यांचा जागीत मृत्यू झाला. तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना तात्काल (aurangabd) औरंगाबाद येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विशाल विसपुते चाळीसगाव कोर्टात वकिलांकडे कारकुनी काम करायचा, त्याच्या पश्‍चात आई व भाऊ असा परिवार आहे. विशालसह त्यांच्या भावाचा अपघातात दुदैवी मृत्यू झाला, विशाल यांची अतिशय गरिबीची परिस्थिती होती. त्याचे लग्न जमल्यामुळे साखरपूडचा कार्यक्रमासाठी ते जात असल्याची माहिती मिळाली आहे. विशाल हा अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू असल्यामुळे त्यांच्या मृत्यू सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.