सामाजिक एकात्मतेचा संदेश देणार्‍या सण- उत्सवांचा आज त्रिवेणी संगम

अक्षय्य तृतीया,ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ गजबजली
सामाजिक एकात्मतेचा संदेश देणार्‍या सण- उत्सवांचा आज त्रिवेणी संगम

जळगाव Jalgaon। प्रतिनिधी

तब्बल कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर अक्षय्य तृतीया (Akshayya Tritiya), रमजान ईद (Ramadan Eid) आणि भगवान परशुराम जयंती (Lord Parashuram Jayanti) हे तीनही उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहेत. या सणांच्या पुर्वसंध्येला फुले व्यापारी संकुल, गांधी चौक परिसरातील बाजारपेठ (Market) गर्दीने अक्षरश: फुलली होती. दरम्यान सामाजिक एकात्मतेचा (social unity) संदेश देणार्‍या या तीनही उत्सवांचा त्रिवेणी संगम उद्या दि. 3 रोजी अनुभवता येणार आहे.

कोरोनामुळे (Corona) दोन वर्ष सण, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. मात्र आता कोरोनाची परिस्थीती निवळल्याने निर्बंधही शिथील करण्यात आले. त्यामुळे उद्या दि. 3 रोजी अक्षय्य तृतीया, रमजान ईद आणि भगवान परशुराम जयंती असा त्रिवेणी उत्सवांचा संगम साजरा केला जाणार आहे.

घागरीसह आंबाही खातोय भाव

अक्षय्य तृतीयेला घागरीला (Ghagari) अनन्य साधारण महत्व आहे. अक्षय्य तृतीयेनिमित्त घागर भरून पुर्वजांचे स्मरण केले जाते. या उत्सवासाठी लागणारी लाल घागरीला मोठी मागणी असल्याने भाव देखिल वधारले आहेत. लहान घागर 80 रूपयांपासून ते 100 रूपयांपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच यंदा आंब्याची (Mango) देखिल मोठी आवक झाल्याने आंबाही भाव खात आहे. बदाम 100 रूपये, केसर 130, दशेरी 180 आणि हापूस आंबा 280 रूपये किलो या दराने उपलब्ध आहे. भाव वधारले असले तरी अक्षय्य तृतीयेसाठी यंदा ग्राहकांकडुन मोठी खरेदी होत आहे.

कपडा मार्केटमध्येही तेजी

मुस्लीम बांधवांसाठी (Muslim brothers) पवित्र असलेल्या रमजान ईदनिमित्त (Ramadan Eid) पुर्वसंध्येला शहरातील फुले व्यापारी संकुल, महात्मा गांधी व्यापारी संकुल याठिकाणच्या कपडा मार्केटमध्ये (Clothing market) नवीन कपडे घेण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. लहान मुलांसह महिलांची फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली होती.

भगवान परशुराम जयंतीनिमित्त आज शोभायात्रा

भगवान परशुराम (Lord Parashuram Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त उद्या दि. 3 रोजी सायंकाळी 5 वा. बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे ग्रामदैवत श्रीराम मंदिर येथून शोभायात्रा (Shobha Yatra) काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे हभप दादा महाराज जोशी, हभप मंगेश महाराज जोशी हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व समाजबांधवांनी शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे (Multilingual Brahmin Sangha) करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.