
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
कौटुंबिक कारणामुळे माहेरी राहत असलेल्या विवाहितेला (married) बेकायदेशीररित्या तीन तलाकाची नोटीस (Triple talaq notice) पाठविल्याचा प्रकार दंगलग्रस्त कॉलनीत उघडकीस आला. याप्रकरणी सासरच्या मंडळींनी विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील दंगलग्रस्त भागातील माहेर असलेल्या हिना कौसर कादिर खान (वय-35) या गेल्या काही महिन्यांपासून माहेरी राहत आहे. धुळे शहरातील जायका मोहल्ला येथील जमीर उल्ला हमीद उल्ला शहा यांच्याशी विवाह झालेला आहे. दि. 29 डिसेंबर 2019 ते दि. 27 डिसेंबर 2022 या काळात महिलेला काहीही कारण नसताना मारहाण व शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक छळ केला.
त्यानंतर हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी दंगलग्रस्त येथे निघून आल्या. दरम्यान तिच्या पतीसह सासरच्या मंडळींनी तिला बेकायदेशीररित्या तलाक तलाक तलाक असे लिहून बेकायदेशीर नोटीस पाठवण्याची घटना समोर आली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती जमीर उल्ला हमीद उल्ला शहा, सासरे हमीद उल्ला शहा, सासू फिरोजाबी हमीद उल्ला शहा, दीर वसीम हमीद शहा, दिराणी नाजनीन समीर शहा, समीर हमीद शहा, हकीम उल्ला शहा, हिना हाकिकुल्लाह शहा, ननंद आबेदाबी उर्फ पिंकी नवीद शेख, परविन उर्फ बीट्टी अहमद मौलाना सर्व रा. मोहल्ला, धुळे यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहे.