स्मृतीस्थळे उभारणीतून शहिद जवानांना मानवंदना

चार गावांमध्ये शहीद जवानांच्या नावाने चौकांच्या सुशोभिकरणासाठी १ कोटी २० लाखांचा निधी, आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
स्मृतीस्थळे उभारणीतून शहिद जवानांना मानवंदना

चाळीसगाव chlisgaon प्रतिनिधी

आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यात नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या ३ महिन्याच्या कालावधीत हौतात्म्य प्राप्त झालेले तालुक्यातील शहीद जवान (Martyr Jawan) यश देशमुख (पिंपळगाव), शहीद जवान सागर धनगर (तांबोळे खु., शहीद जवान संभाजी पानसरे (शिंदी), शहीद जवान अमित पाटील (वाकडी) यांच्या नावाने त्यांच्या मुळगावी चौक सुशोभिकरण व स्मृतीस्थळ (Square beautification and memorial) उभारण्यासाठी प्रत्येकी ३० लाख रुपये असा एकूण जवळापास १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर (Funding approved) झाला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज दि.२६ मे रोजी ग्रामविकास विभागातर्फे निघाला आहे.

राज्यात आतापर्यत मुलभूत सुविधा निधीतून शहिदांच्या (martyrs) नावाने सुशोभीकरण कामांसाठी निधी देण्यास तांत्रिक अडचणी असल्याचे कारण दिले जात होते. मात्र जे शहीद आपले कुटुंब, गाव सोडून देशासाठी प्राणांची आहुती देतात त्यांच्या नावाने शहिदांच्या मुळगावी चौक तयार करण्याच्या धोरणास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात यावी. अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांच्याकडे केली होती, आणि अखेर दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर याबाबत शासन निर्णय निघाल्याने भविष्यात संपूर्ण राज्यभरात मुलभूत सुविधा निधीतून शहीद जवानांच्या नावाने चौकांचे सुशोभीकरण (Beautification of squares) केले जाणार आहे.

तसेच येणार्‍या काळात चाळीसगाव तालुक्यातील यापूर्वी शहीद झालेल्या जवानांच्या नावाने त्यांच्या गावात देखील चौक सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध (Funds available) करून दिला जाणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.चाळीसगाव ही शहिदांची भूमी आहे, तालुक्यातील अनेक शहीद जवानांनी भारतमातेच्या रक्षणासाठी बलिदान दिले व त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले. मात्र नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या ३ महिन्याच्या कालावधीत चाळीसगाव तालुक्यातील एका पाठोपाठ एक अश्या ४ जवानांना वीरगती (Veeragati) प्राप्त झाली व अवघ्या तालुका शोकसागरात बुडाला.

भारतमातेच्या रक्षणासाठी हजारो जवान आपल्या प्राणांची आहुती देतात. ज्या गावातील, तालुक्यातील जवान शहीद होतो त्या गावात अतिशय भावपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात आपल्या गावाच्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप दिला जातो. मंत्री, नेते, खासदार, आमदार येतात व भाषणे देऊन जातात मात्र त्यानंतर त्या शहीद वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी ना मंत्री येतो ना आमदार ना खासदार. काही मोजक्या गावातून लोकवर्गणी करून शहीद स्मारक उभी केली जातात.

मात्र अनेक गावांना साधा फलक देखील उभा राहत नाही हे वास्तव आहे. या सर्व प्रकाराला फाटा देत शहीद जवानांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण करत असताना उपस्थित जनसमुदायाला शब्द दिला होता. की या सर्व शहीद जवानांच्या नावाने त्यांच्या गावात एक चौक सुशोभित केला जाईल व त्याठिकाणी त्यांचे स्मृतीस्थळ उभारले जाईल. अखेर आमदार चव्हाण यांनी आपला शब्द पूर्ण करत पिंपळगाव, शिंदी, तांबोळे व वाकडी या गावांच्या वीर सुपुत्रांच्या नावे चौंक उभारण्यास मंजुरी व निधी मिळवून आणत कृतीशील श्रद्धांजली वाहिली आहे.

शिवनेरी फाउंडेशनचा पुढाकार-

शहीद वीर जवानांना कृतीशील श्रद्धांजली देण्याचा पायंडा चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी घालून दिला असून केवळ चाळीसगाव तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात कुठेही व कोणत्याही गावात जवान शहीद झाल्यास तेथे अंत्यसंस्कार प्रसंगी फुलांची सजावट, रांगोळ्या आदींच्या तयारीची जबाबदारी ही आमदार मंगेश चव्हाण व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांच्यावतीने घेतली जाते. झालेल्या दुखद प्रसंगी एक आधार देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com