चाळीसगाव-मेहुणबारे रस्त्यावर विमा असेल तरच प्रवास करा..!

खासदार-आमदार या रस्त्यावरुन प्रवास करीत नाही का ? चौदपरीकरणाच्या नावाखाली रस्त्याची चाळण,
चाळीसगाव-मेहुणबारे रस्त्यावर विमा असेल तरच प्रवास करा..!

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalsgaon प्रतिनिधी-

चाळीसगाव-धुळे (Chalisgaon-Dhule) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ (National Highway No २११) या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम संथ (slowly) गतीने सुरू आहे. चौपदरीकरणाच्या नावाखाली ठेकेदाराने (Contractor) रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे (Maintenance and repair)जाणीवपूर्वक दुर्लक्ष (Deliberate) केल्यामुळे संपूर्ण रस्त्यांची वाट लागली आहे. विशेषता : चाळीसगाव ते मेहुणबारे दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले (Pits on the road) असून खड्ड्यात रस्ता शोधावा (Find the road in the pit) लागत आहे.

या रस्त्यावरुन वाहन घेवून जाणे म्हणजे स्मशानभूमीच्या दिशेने जाणे असे म्हटले जात आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे कुठल्याही क्षणी अपघात होवून जीव जावू शकतो. त्यामुळे स्वता;ची विमा पॉलीशी असेल तरच या रस्त्यावरुन प्रवास करावा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तर तालुक्यातील खासदार व आमदार या रस्त्यावरुन प्रवास करीत नाही का ? असा देखील प्रश्‍न उपस्थित केला जात असून खराब रस्त्यामुळे अनेकाचे बळी गेले आहेत.

भारतीय राजमार्ग प्राधिकरणाकडून कलथिया कंपनीने रस्त्याच्या कामाचा ठेका देण्यात आला आहे. कंपनीने ते काम त्यांनी दोन टप्प्यात विभागून दुसरीकडे सोपवलेले दिसते. बोढरे फाटा ते मेहूणबारे एकाकडे तर मेहुणबारे ते धुळे दुसर्‍याकडे. त्यात अजून तिसरा भाग चाळीसगाव वळण रस्त्याचे ठिकाण म्हणजे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्यावर कल्याण टोल वसुली कंपनीकडे. त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती असुनही ते सोयीस्कर दुर्लक्ष करतात. जनभावनेचा उद्रेक होऊनही भारतीय राजमार्ग प्राधिकरण चे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. चाळीसगाव तालुक्यातून जाणार्‍या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगाव शहराबाहेरून जाणारा वळणरस्ता हा खड्डेमय झाला आहे.त्यावरून होणार्‍या वाहतुकीस अडचण होत आहे.

विशेष म्हणजे या बायपास रस्त्यावरील वाहतुकीसाठी टोल आकारला जात असून या रस्त्यावरील खड्डे भरण्याची आणि रस्ता पुर्ववत करण्याची मागणी वाहन चालक व नागरीकांकडून हेात असूनही त्याकडे संबंधीत ठेकेदाराचे दुर्लक्षच आहे. म्हणजे खराब झालेला रस्ता दुरूस्त करायचा नाही आणि टोल वसुली मात्र सुरू ठेवायची असा लुटमारीचा प्रकार सुरू आहे. हा प्रकार संबंधीत यंत्रणेला व खासदार, आमदारांना दिसत नाही का? की दिसत असून देखील ते याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत? संबंधीतांची इतकी मनमानी कशी खपवून घेतली जाते असा देखील प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसापासून या मार्गावरील मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या प्रवासात ट्रक व अन्य मोठ्या वाहनांना प्रकाश झोतात खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने मोटारसायकली देखील घसरण्याचे प्रकार घडतात. तर ट्रक वारंवार फेल होवून ट्राफीक जामची समस्या नित्याची झाली आहे.

अनेकाना कंबराचे व पाठीचे आजार जडले आहेत. तर मोठ्या वाहनाचे आतापर्यंत लाखो रुपयाचे नूकसान झाले आहे, याची भरपाई कोण देणार ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी पायाला भिकरी लावून फिरणारे आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधीना या रस्त्याची दुरशा दिसत नाही. चाळीसगाव ते मेहुणबारेपर्यंतच्या रस्त्याची त्वरित डागडुजी करुन, लोकांचा जीव सुरुक्षीत करावा अशी मागणी होत आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असतांना मूळ रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधीत ठेकेदाराची आहे. मात्र या महामार्गावरील या मूळ रस्त्याची इतकी दुर्दशा झाली आहे की, वाहनधारक अक्षरता मेकाकुटीला आले आहेत. जीवघेण्या व खराब रस्त्यामुळे चाळीसगाव ते धुळे हा प्रवास दोन तासाहून अधिक झाला आहे.

धुळ्याकडे पुढे जाण्यासाठी व उत्तरभारताकडून दक्षिणेकडे जाणारा हा महत्वाचा रस्ता असल्याने या रस्त्यावरून रात्रंदिवस हजारो लहान मोठी वाहने धावत असतांना देखील मूळ रस्त्याची चांगली डागडुजी करावी. रस्त्याची भयंकर स्थिती पाहता केव्हाही अपघात होवून मोठी दुरघटना घडू शकते.

मरणप्राय रस्ता- " चाळीसगाव ते धुळे विशेषता; मेहुणबारे ते चाळीसगाव हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. गेल्या तीन वर्षापासून आम आदमी पार्टीतर्फे आम्ही वेळोवेळी प्रशासनास निवेदन देत आहेत. परंतू तात्पूत्या स्वरुपाची कच्ची डागडुजी करुन संबंधीत ठेकेदार वेळ मारुन नेत आहे. एकीकडे चौपदीकरण तर दुसरीकडे मरणप्राय रस्ता प्रवशासाठी करुन ठेवला आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधा ही बाब दिसत नाही का? संबंधीत रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संखोल चौकशी होवून दोषींवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे ".

प्रा.तुषार निकम, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com