
जळगाव- Jalgaon
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश अखेर मंगळवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी काढले. यामध्ये जिल्ह्यातील १७ पोलीस निरीक्षक, ११ सहाय्यक पोलीस निरीक्षक तर १५ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.
जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस ठाण्याच्या पदभार पप्रभारीवर होता. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकाळ पूर्ण झालेल्या तसेच प्रशासकीय व विनंती बदल्या रखडलेल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात आठ पोलीस निरीक्षकांचे बदली झाली होती. परंतु त्यांना पोलीस ठाणे देण्यात आलेले नसल्याने त्यांना नियंत्रण कक्षात नियुक्ती दिली होती. दरम्यान अखेर आज जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी रात्री उशिरा काढले. बदली प्रक्रियेत अनेक पोलीस निरीक्षक,पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांना लॉटरी लागली आहे.
या पोलीस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या
रामानंद नगर पोलीस निरीक्षकपदी शिल्पा पाटील, चाळीसगाव शहर पोलीस ठाणे संदीप बटू पाटील, चोपडा ग्रामीणसाठी कावेरी कमलाकर, यावल पोलीस ठाणे राकेश माणगावकर, जिल्हा विधी शाखा रंगनाथ धारबडे, चाळीसगाव ग्रामीण बबन आव्हाड, धरणगाव पोलीस ठाणे उद्धव डमाळे, भडगाव पोलीस ठाणे राजेंद्र पाटील, एरंडोल पोलीस ठाणे सतीश गोराडे, अमळनेर पोलीस ठाणे विजय शिंदे, एमआयडीसी पोलीस ठाणे जयपाल हिरे,जिल्हापेठ पोलीस ठाणे ज्ञानेश्वर जाधव, सायबर पोलीस ठाणे अशोक उत्तेकर, नियंत्रण कक्ष संजय ठेंगे यांच्या नियमित व प्रशासकीय बदल्या करण्यात आले आहे. तर शनिपेठ पोलीस ठाणे शंकर शेळके, पाचोरा पोलीस ठाणे राहुल खताळ व चोपडा शहर पोलीस ठाणे कांतीलाल पाटील यांची विनंतीवरून बदली करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षकांचीही लॉटरी
सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या मानव संसाधन विभागात सुनंदा पाटील, वाचक एचडीपीओ चाळीसगाव हर्षा जाधव, भुसावळ तालुका पोलीस ठाणे अमोल पवार, एमआयडीसी पोलीस ठाणे अमोल मोरे, जळगाव शहर पोलीस ठाणे किशोर पवार, भुसावळ शहर पोलीस ठाणे निलेश गायकवाड, यावल पोलीस ठाणे विनोद कुमार गोसावी, रावेर पोलीस ठाणे शितल कुमार नाईक, सावदा पोलीस ठाणे प्रभारी जालिंदर पळे, अडावद पोलीस ठाणे प्रभारी गणेपुरी बुवा, एमआयडीसी पोलीस ठाणे रामेश्वर मोताळे यांची प्रशासकीय व मुदतवाढ म्हणून बदली झाली आहे. तसेच जिल्हा पेठ पोलीस ठाणे किरण दांडगे, शहर वाहतूक शाखा संदीप हजारे, धरणगाव पोलीस ठाणे प्रमोद कठोरे तर मुक्ताईनगर पोलीस ठाणे संदीप दुनगहू यांची विनंतीवरून बदली करण्यात आली आहे
१५ पोलीस उपनिरीक्षकांची बदली
जिल्ह्यातील 15 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहे. यामध्ये अमळनेर पोलीस ठाणे भैय्यासाहेब देशमुख, डायल 112 गणेश अहिरे, सावदा पोलीस ठाणे विनोद खांडबहाले, पाचोरा पोलीस ठाणे विजया बसावे, यावल पोलीस ठाणे अविनाश दहिफळे, मुक्ताईनगर पोलीस ठाणे संदीप चेढे, नियंत्रण कक्ष गोकुळ गवारे यांना प्रशासकीय व नियमित पदस्थापना देण्यात आली आहे. तर स्थानिक गुन्हे शाखा गणेश चौभे, सावदा पोलीस ठाणे शांताराम पाटील, स्थानिक गुन्हे शाखा गणेश वाघमारे, वाचक फ़ैजपूर उपविभाग सुनील वाणी, शनिपेठ पोलीस ठाणे प्रदीप चांदलकर, जिल्हा विधी शाखा परविन तडवी, आर्थिक गुन्हे शाखा सुदाम काकडे, शनीपेठ पोलीस ठाणे अमोल देवढे यांची विनंती वरून बदली करण्यात आली आहे.