
चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी
चाळीसगाव (chalsigaon) पोलीस स्टेशनचे कर्तत्व दक्ष पोलीस निरिक्षक के.के.पाटील (Inspector of Police KK Patil) यांची तातडीने जळगाव (Jalgaon) येथे कंट्रोल रुमला बदली करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे आदेश त्यांना प्राप्त झाले आहे. परंतू ही बदली तात्पुरती असल्याचे आदेशात म्हटले आहे.
एका कर्तत्वदक्ष आधिकार्यांच्या बदलीमुळे चाळीसगावात विविध चर्चांना ऊत आला आहे. तर दोन नबंरवाल्याना आनंद झाला आहे. परंतू बदलीचे कारण नुकतेच चाळीसगाव (chalsigaon) पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी लाच घेतांना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात अडकले होते. त्यासंबंधीच्या चौकशीसाठी तात्पुरती बदली झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चौकशी झाल्यानतंर पुन्हा के.के.पाटील (KK Patil) चाळीसगाव (chalsigaon) येथे रुजू होण्याची शक्यता आहे. के.के.पाटील हे गेल्या काही दिवसांपासून भोलेबाबांच्या दर्शनासाठी अंमरनाथ यात्रेला गेले होते. तेथून आल्यानतंर त्यांची तब्यत बरी नसल्यामुळे ते नाशिक येथे असतांना त्यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले आहे.