चाळीसगाव : मुख्याधिकारी शंकर गोरे यांची बदली

अहमदनगर महापालिकेच्या आयुक्त पदावर बढती, चाळीसगाव पालिकेत पुन्हा पूर्णवेळ मुख्याधिकार्‍यांची उणीव
चाळीसगाव : मुख्याधिकारी शंकर गोरे यांची बदली

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदावर प्रशासकिय बदली झाली आहे. त्यासंबंधीचे उपसचिवांचे आदेशन त्यांना प्राप्त झाला असून आज(दि,१२) पदाभार स्विकारचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान गेल्या सहा महिन्यापूर्वीच ते चाळीसगाव न.पा.त मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले होते.

तत्पूर्वी गेल्या दिड वर्षांपासून चाळीसगाव न.पा.मधील राजकिय आखाड्यामुळे कुणीही मुख्याधिकारी येथे येण्यास तयार नसल्याचा चर्चा होत्या. परंतू सहा महिन्यापूर्वी शंकर गोरे आल्यामुळे शहरातील विकासकामाना गती मिळेल अशी आशा होती. परंतू पुन्हा आता त्यांची बदली झाल्याने, विकास कामे थांबणार आहेत. सद्या चाळीसगाव न.पा.च्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून भडगाव न.पा.चे मुख्याधिकारी विकास नवाळ यांच्याकडे कार्यभार देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com