गद्दारांना जिल्ह्यात थारा देवू नका

पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या सूचना; जिल्हा प्रमुखांची माहिती
गद्दारांना जिल्ह्यात थारा देवू नका

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शिवसेनेने (Shiv Sena) सगळ्यांना भरभरुन दिले. आमदारकी दिली, मंत्रीपद दिले (Given MLAs, given ministerial posts) तरीदेखील पक्षाशी बेईमानी (Dishonesty with the party) करुन, काही आमदारांनी बंडखोरी (MLAs revolt) केली. शिवसेनेच्या विचारांशी प्रतारणा करणार्‍या गद्दारांना जिल्ह्यात थारा देवू नका (Do not allow traitors in the district) अशा स्पष्ट सूचना शिवसेनेचे पक्षप्रमुख (Shiv Sena party chief) तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या (meeting of the National Executive) बैठकीत दिल्या आहेत.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर चार दिवसांपासून राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथै सेना भवनात राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यभरातील जिल्हा प्रमुखांनादेखील निमंत्रित करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातून जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ.हर्षल माने, समाधान महाजन हे उपस्थित होते.

आगामी निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा

जे आमदार शिवसेनेला सोडून गेले त्यांचा विचार न करता, पक्ष संघटना मजबूत करण्याचे आदेश पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले. तसेच आगामी काळात होणार्‍या पालिका, जिल्हापरिषद, पंचायत समित्या या निवडणुकांसाठी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा अशा सूचनाही ठाकरे यांनी दिल्या.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संदीपान भुमरेंसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव घेत त्यांना मंत्रीपदाची संधी दिली. तरी ते सोडून गेले अशी खंत व्यक्त केली. आगामी काळात कुणाचीही चिंता न करता, पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख शिवसेना

ज्यांना पक्षाने आमदारकीची संधी दिली त्यांनीच पक्षाशी विश्वासघात केला. आम्ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शिवसेनेला पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागणार आहोत. जिल्ह्यातील आमदार गेल्यामुळे जी स्पेस निर्माण झाली आहे, ती भरुन काढली जाईल.

डॉ.हर्षल माने, जिल्हाप्रमुख शिवसेना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com