ऐन सुट्टीत रेल्वे गाड्या रद्द

प्रवाशांचा हिरमोड : वर्धा यार्ड व सिग्नलिंगच्या कामाचा परिणाम
ऐन सुट्टीत रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या (Central Railway) नागपूर विभागातील (Nagpur Division) वर्धा-चितोडा विभागादरम्यान वर्धा जंक्शन स्थानकावर (Wardha Junction Station) यार्ड बदल (yard change) आणि सिग्नलिंग बदलाचे (Signaling modification work) काम करण्यात येणार असल्यामुळे भुसावळ विभागातून धावणार्‍या काही गाड्या रद्द (Trains canceled) करण्यात आल्या आहे.

ऐन विकेंड व सुट्टीच्या काळात गाड्या रद्द करण्यात आल्या मुळे अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच जोडून आलेल्या सुटीचा आनंद घेणार्‍या प्रवाशांना आपल्या नियोजनावर पाणी फिरवत रद्द करण्याची किंवा पर्यायी व्यवस्था करावा लागणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्य अशा -

गाडी क्र.01371 अमरावती-वर्धा मेमू.

गाडी क्र. 01372 वर्धा - अमरावती मेमू 11 ते 17 ऑगस्ट.

गाडी क्र. 11039 कोल्हापुर - गोंदिया एक्सप्रेस 15,16व 17 ऑगस्ट.

गाडी क्र. 11040 गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस 16,17 व 18 ऑगस्ट रोजी.

11404 कोल्हापूर- नागपुर एक्सप्रेस 15 रोजी.

11403- नागपुर -कोल्हापुर 16 रोजी.

18030 शालीमार - लो.टी.ट. ऍक्स्प्रेस 15, 16 ऑगस्ट रोजी.

18029- लो.टी.ट. - शालीमार एक्सप्रेस 15, 16 ऑगस्ट,

01127 लो टी टी - बल्लारशाह एक्सप्रेस 16 ऑगस्ट रोजी .

01128 बल्लारशाह - लो टी ट एक्सप्रेस 17 रोजी.

12120 अजनी - अमरावती एक्सप्रेस 15, 16 व 17 ऑगस्ट रोजी.

12119 अमरावती - अजनी एक्सप्रेस 16, 17, व 18 ऑगस्ट रोजी रद्द ठेवण्यात आल्या आहे.

मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या -

गाडी क्र. 12405 भुसावळ - हजरत मार्ग निजामुद्दीन एक्सप्रेस 16 ऑगस्ट रोजी बडनेरा-अमरावती-नरखेर-इटारसी मार्गे वळवण्यात येईल

गाडी क्र. 22664 जोधपुर - चेन्नई एग्मोरे एक्सप्रेस 15 ऑगस्ट रोजी बडनेरा- नारखेड- नागपूर-बल्हारशाह मार्गे वळवण्यात येईल.

गाडी क्र. 22737 - सेचुन्द्राबाद - हिसार एक्सप्रेस 16 व 17 ऑगस्ट रोजी बल्हारशाह-नागपूर-नारखेर-बडनेरामार्गे वळवण्यात येईल.

गाडी क्र. 020913 पोरबंदर - सेलु एक्सप्रेस 14 व 21 ऑगस्ट रोजी जळगाव-भुसावळ-इटारसी-नागपूर मार्गे वळवण्यात येईल.

गाडी क्र. 00914 सेलु - पोरबंदर एक्सप्रेस 14, 17 ऑगस्ट रोजी नागपूर- इटारसी- भुसावळ-जळगाव मार्गे वळवण्यात येईल.

00113 - भिवंडी - संकरैल गुड्स टर्मिनल एक्सप्रेस 14 व 17 रोजी जळगाव-भुसावळ-इटारसी-नागपूर मार्गे वळवण्यात येईल.

गाडी क्र. 00114 संकरैल गुड्स टर्मिनल - भिवंडी एक्सप्रेस 14 व 17 रोजी नागपूर-इटारसी-भुसावळ-जळगाव मार्गे वळवण्यात येईल.

प्रवाशांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com