कन्नड घाटात वाहतुकीची कोंडी, रुग्णवाहिका अडकली

कन्नड घाटात वाहतुकीची कोंडी, रुग्णवाहिका अडकली

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कन्नड घाटातील (Kannada Ghat) रस्त्याची दुरुस्ती अपूर्ण असताना तो चालू करण्यात आला आहे. घाट सुरु झाल्यापासून दरारोज वाहतुकीची कोंडी (Traffic jam) होत आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे रुग्णांना घेवून जाणार्‍या रुग्णवाहिकेची दररोज कोंडी होत आहे. अनेक रुग्णांचा जीव टागणीला लागत असल्याचे चित्र दररोज दिसत आहे. त्यामुळे घाटातील अवजड वाहतुक त्वरित बंद करुन, घाटात पूर्णता; दुरुस्ती झाल्यानतंरच वाहतुकीसाठी सुरु करावा अशी मागणी होत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून कन्नड घाट दररोज जाम होत आहे. आज गंभीर अवस्थेतिल रूग्णाला रूग्नवाहीकेतून औरंगाबादकडे नेतांना रुग्णवाहिका घाटात अडकली, रूग्ना सोबतचे कुटूंबिय हात जोडून देवाला प्रार्थना करतांना काहीना दिसले. शेवटी रस्त्याच्या काम करीत असलेले मंजुरानी रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com