पारोळ्यात राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा : प्रवाशांचे हाल

बायपास लवकर सुरू करण्याची मागणी
पारोळ्यात राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा : प्रवाशांचे हाल

पारोळा - प्रतिनिधी parola

शहरातून गेलेल्या (National Highways) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर (amalner) अमळनेर नाका, उंदिरखेडा नाका, मराठी शाळा क्रमांक १, कजगाव नाका चौफुली, चोरवड नाका, बस स्थानक, (Kisan College) किसान कॉलेज पर्यंत आज सकाळी नऊ ते अकरा वाजे दरम्यान सुमारे तीन तास मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

यावेळी वाहतूक रक्षक यानी ठीक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा काडून प्रवाशांचे हाल थांबवतांना दिसून आले. प्रवाश्यांना या वाहतूक ठप्प मुळे प्रवासी व वाहनधारकांनी यावेळी संताप व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर झालेल्या या वाहतुकीला सुरळीत करण्यासाठी काही वाहन धारक स्वतः रस्त्यावरती उतरून वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नात दिसत होते.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरती झालेल्या अतिक्रमण मुळे वाहतुक कोंडीत गाडीच्या एकमेकांना टचिंग झाल्याने वाद होत असतो तर काही ठिकाणी वाहने पुढे काढण्याच्या प्रयत्नात भांडण होतांना दिसुन आली.

शहरात ग्रामीण भागासह अमळनेर, धरणगाव, कासोदा, एरंडोल, भडगाव, कजगाव, धुळे आदी भागांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहनांची संख्या मोठी आहे.

या अवैध प्रवासी वाहतूक धारक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे कजगाव रस्त्यासह, बस स्थानक, कजगाव चौफुली, चोरवड नाका, उंदिरखेडा नाका, अमळनेर रोड आदी ठिकाणी वाहतुकीला सातत्याने अडथळा निर्माण होऊन वाहतुकीचा खोळंबा होत असतो व तसेच कजगाव नाका हा सर्वात जास्त वर्दळीच्या रस्ता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते तसेच या कजगाव रस्त्याच्या काँक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम पंधरा ते वीस दिवसापासून रखडल्याने या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या रहिवाशी व वाहनधारकांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे.

Related Stories

No stories found.