
जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून शहरातील चौकाचौकांमध्ये सिग्न बसविण्यात आले आहे.
परंतु हे सिग्नल गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. परंतु हे सिग्नल दुरुस्तीसाठी वाहतुक शाखा व महानगरपालिका पुढाकार घेत नसल्याने सिग्नच्या दुरुस्तीला ग्रहण लागले आहे.
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच आहे. यातच शहरातील रस्ते अरुंद होत असल्याने वाहतुकीच्या समस्या सर्वांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
शहरातील वाहतुकीची होणारी कोंडी कमी करण्यासाठी तसेच वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून शहरातील चौकचौकांमध्ये सिग्न बसविण्यात आले आहे.
परंतु हे सिग्न गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवित सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडीत असल्याचे चित्र शहरात दिवसभर दिसून येत आहे.
25 पैकी उरले फक्त 13
शहरात 25 ठिकाणी सिग्न यंत्रणा कार्यान्वयीत करण्यात आली होती. परंतु यातील काही सिग्न रस्त्यांच्या कामांमुळे काढण्यात आले असून सद्याच्या स्थिती केवळ 11 सिग्नल शहरात कार्यान्वयीत असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.
संबंधित अधिकार्यांचे दुर्लक्ष
शहरातील वाहतुकीची कोंडी दुर करण्यासाठी महापालिकेकडून शहरातील चौकांसह महामार्गावर 24 ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे.
या सिग्नलच्या देखभाल व दुरुस्तीचा एका खासगी कंपनीला कंत्राट दिला आहे. परंतु अनेक महिन्यांपासून हे सिग्नल बंद अवस्थेत असून देखील याची दुरुस्ती देखील करीत नसल्याने याकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात एकच सिग्नल कार्यान्वयीत
शहरातील मुख्य चौकांसह महामार्गावर 25 ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून सिग्नल उभारण्यात आले आहे. परंतु यापैकी केवळ कोर्टचौकातीलच सिग्नल कार्यान्वयीत असल्याने ते नियमीत सुुरु असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील टॉवरचौक, बॉम्बे लॉज चौक, चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, पांडे डेअरी चौक, नेरीनाका चौक, एस. टी. वर्क शॉप चौक, कालंकामाता मंदिर चौक, नेल्सन मंडेला चौक, काशीनाथ लॉज चौक, रेमंड चौक, एमआयडीसी फायर स्टेशन चौक, ईच्छादेवी मंदिर चौक, आकाशवाणी चौक, हॉटेल संध्या छाया चौक, एम. जे. कॉलेज चौक, पंचज हॉस्पीटल चौक, टागोरनगर चौक, ख्वॉजामिया चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेट बँक चौक, कोर्ट चौक, गोेविंदा रिक्षा स्टॉप चौक, गुजराल पेट्रोल पंप चौक याठिकाणी मनपाकडून सिग्नल बसविण्यात आले आहे. परंतु यातील बहुतांश म्हणजेच 13 सिग्नल रस्त्यांच्या कामांमुळे काढून टाकण्यात आले आहे.