photos #टॉमीने शटरच्या पट्ट्या तोडून सराफाचे दुकान फोडले

चोरी करणारे तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद
photos #टॉमीने शटरच्या पट्ट्या तोडून सराफाचे दुकान फोडले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील सराफ बाजारातील (Saraf Bazar) मनीष ज्वेलर्सच्या (Manish Jewellers,) शटर्सच्या (Shutters) लोखंडी टॉमीने ((Iron Tommy) पट्ट्या व लोखंडी गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी (thieves) दुकान फोडल्याची (shop broken) घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याठिकाणाहून चोरट्यांनी 2 लाख 10 हजार रुपयांचे दागिने तसेच 20 हजार रुपये रोख असा एकूण 2 लाख 30 हजार रुपयांचा (2 lakh 30 thousand rupees) ऐवज चोरुन (stolen) नेला. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली . पोलिसांनी (police) सीसीटीव्ही ( CCTV footage) फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरुन तपास सुरु आहे.

शहरातील सराफ बाजारात भवानी मंदिराच्या पुढे ललीत घीसुलाल वर्मा (वय-36,रा.गणपती नगर, ) यांचे मनीष ज्वेलर्स नावाचे सराफ दुकान असून तेथे सोने चांदिच्या दागिने विक्रीसह घडविण्याचे देखील काम करतात. तसेच त्यांचे वडिल घीसुलाल वर्मा व भाऊ विजय हे देखील दुकानाचे कामकाज बघतात. सोमवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास दुकान बंद केल्यावर सर्व जण घरी गेले. मंगळवारी सकाळी साडे सात वाजता त्यांच्या दुकाना शेजारील कमल ज्वेलर्सचे मालक कमल शर्मा यांनी ललीत यांना फोन करुन दुकान उघडे व शटरची पट्टी तुटलेली असल्याचे कळविले. त्यानुसार ललीत यांनी लागलीच दुकानात धाव घेतली असता शटर्सच्या पट्ट्या व लोखंडी गेटचे कुलूप तुटलेले दिसून आले.

photos #टॉमीने शटरच्या पट्ट्या तोडून सराफाचे दुकान फोडले
पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे संतप्त; बैठकीतून घेतला काढता पाय

श्वान,फॉरेन्सीक पथकाला पाचारण

सराफ बाजारात चोरी झाल्याची माहिती मिळतच शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, सहायक निरीक्षक रमेश चव्हाण, सहायक फौजदार रवींद्र पाटील, संजय शेलार, राहुल पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे, किरण वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपअधीक्षक संदीप गावीत यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. श्वान पथक तसेच अंगुली मुद्राच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

photos #टॉमीने शटरच्या पट्ट्या तोडून सराफाचे दुकान फोडले
Visual Story # क्रितीचा ‘ठुमकेश्वरी’ अंदाज पाहिलात का?

चोरी करण्यापूर्वी कापली सीसीटीव्हीची वायर

चोरट्यांनी दुकानाचे गेट व शटर तोडल्यानंतर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची वायर कापली. त्यानंतर डिव्हीआर काढून फेकलेला होता. त्यानतर दुकानातील ड्रावरमध्ये ठेवलेली 20 हजाराची रोकड तसेच 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातल्या 12 जोडी, सोन्याच्या पेंडलचे 12 नग, एक किलो चांदी त्यात विविध प्रकारचे नगर आदी ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

photos #टॉमीने शटरच्या पट्ट्या तोडून सराफाचे दुकान फोडले
महापौर जयश्री महाजनांकडून जळगावकरांची दिशाभूल
photos #टॉमीने शटरच्या पट्ट्या तोडून सराफाचे दुकान फोडले
बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या नराधमाला पाच वर्षाची शिक्षा

मुद्देमाल चोरुन नेतांनाचे फुटेज ताब्यात

पोलिसांनी दुकान फोडलेल्या आजूबाजूच्या दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी सव्वातीन वाजेच्या सुमारास तीन चोरटे हातात टॉमी घेवून वर्मा यांच्या दुकानाकडे जातांना दिसले. त्यानंतर सुमारे तास दीड तासानंतर हे चोरटे मुद्देमाल घेवून पसार झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरुन त्यांचा तपास सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com