अभियंत्यांवरील गुन्हे दाखल करण्यास टोलवाटोलवी !

गौणखनिज बनावट पावत्याप्रकरणी सीईओंच्या आदेशाला ठेंगा
अभियंत्यांवरील गुन्हे दाखल करण्यास टोलवाटोलवी !
जळगाव जि.पJalgaon ZP

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा परिषद मालकीच्या (Owned by Zilla Parishad) पाझर तलावातून (percolation lake)अवैधरित्या गौणखनिज वाहतुकीसाठी (Illegal secondary minerals) महसूल विभागाच्या (revenue department) नावे बनावट पावत्या (Fake receipts) बनवून जळगावसह चार तालुक्यात शासनाची लाखो रुपयांत फसवणूक (Cheating) केल्याची तक्रार (Complaint) जि.प.सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे (ZP member Pallavi Pramod Saavkare) यांनी जिल्हाधिकार्‍यांकडेे (Collector) केली होती. त्यानंतर सीईओंनी चौकशी समिती नियुक्त करुन अहवाल मागविला होता. या अहवालानुसार गौणखनिज प्रकरणात घोळ व अपहार (case of minor minerals, embezzlement and embezzlement) झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर 14 कंत्राटदार, जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाशी संबंधित उपविभागातील अभियंत्यांवर गुन्हे दाखल (Crimes filed against engineers) करण्याचे आदेश जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया (ZP CEO Dr. Pankaj Asia) यांनी दिले होते. मात्र, आठवडा उलटूनही एकावरही गुन्हा दाखल न झाल्याने सीईओंच्या आदेशाला जि.प.अधिकार्‍यांकडूनच ठेंगा दाखविला जात आहे.

जळगाव, एरंडोल, भडगाव, पाचोरा या तालुक्यातील लघुसिंचन विभागाशी संबंधित विविध साठवण बंधारे, सिमेंट नाला बंधारे, कोल्हापूर पद्धतीने दुरूस्ती अशी विविध 36 कामांमधील रॉयल्टीची रक्कम न भरता त्याच्या बनावट पावती दाखवून लाखो रुपयांची हेराफेरी करण्यात आली आहे. मात्र, चौकशी अहवालानुसार 63 लाख 50 हजार 411 रूपयांची हेराफेरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन 15 नोव्हेंबर रोजी या प्रकरणातील कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून सदरची रक्कम व्याजासह वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. तर डेप्युटी इंजिनिअर यांच्यावरील कारवाईबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच ज्युनिअर इंजिनिअर, शाखा अभियंता यांना नोटीस बजावून याबाबत खुलासे सादर करण्याचे आदेश सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत. त्यामुळे चार तालुक्यातील ठेकेदारांसह अभियंत्यांचे धाबे दणाणले आहे. गुन्हे दाखल होऊ नये,यासाठी राजकीय पदाधिकार्‍यांना हात जोडत आहे.

आधी पैसे भरा,मग पाहू...

गौणखनिज प्रकरणातील दोषी ठेकेदारांसह अभियंत्यांनी सीईओ डॉ.पंकज आशिया यांची भेट घेऊन व्याजासह अपहाराची रक्कम भरण्यास तयार आहे. मात्र, गुन्हे दाखल करु नका, अशी विनवणी करीत आहे. मात्र, आधी पैसे भरा.मग नंतर पाहू, अशी भूमिका सीईओंनी घेल्याची चर्चा आहे. तर काहींनी जि.प.पदाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांनाही कारवाई होऊ नये,म्हणून हात जोडत असल्याची चर्चा होत आहे.

भडगाव,पाचोरा,एरंडोल,जळगाव या चार तालुक्यात अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाच्या नावे बनावट पावत्या बनवून ठेकेदारांसह अभियंत्यांनी शासनाची लाखो रुपयांत फसवणूक केली. या प्रकरणात बोगस पावत्यांसाठी राजमुद्रेचा गैरवापर केला आहे. सीईओंनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत गुन्हे दाखल होऊन दोषींकडून व्याजासह रक्कम वसूल होत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरुच ठेवू
पल्लवी सावकारे,जिल्हापरिषद सदस्या,जळगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com