आयुध निर्माणींचा आज काळा दिवस

ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन : 41 निर्माणीमधील 80 हजार कर्मचारी होणार सहभागी
आयुध निर्माणींचा आज काळा दिवस
संग्रहित फोटो

भुसावळ Bhusawal (प्रतिनिधी) -

आयुध निर्माणीच्या (ordnance factory) निगमीकरण उद्घाटन कार्यक्रम १५ रोजी पार पडत आहे. मात्र या कार्यक्रमावर देशभरातील आयुध निर्माणीतील ८० हजार कर्मचार्‍यांनी बहिष्कार (employee) टाकला आहे. हा दिवस काळा दिवस (Black day) म्हणून साजरा करणार असून निर्माणी कर्मचारी हजर राहणार नसल्याची माहिती ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने (all India defence employees federation) कळविले आहे.

आयुध कारखान्यांना केंद्र सरकार विजयादशमीला भांडवलदार वर्गाला ,देश-विदेशातील या वर्गाला सोपविण्यासाठी सुरु असलेल्या प्रक्रीये मध्ये निगमीकरण करुन ४१ आयुध कारखान्यांचे ७ तुकडे केले गेले आहेत .देशातिल जनतेला भटकविले जात आहे.

राष्ट्रीय सुरक्षे चे राजनिती करण केले जात असल्याा आरोप कर्मचारी संघटनांनी केला असून देशातील सर्व निर्माणींचे ग्रुप ­,इ,उ चे सर्व कर्मचारी सरकारच्या कार्यक्रमावर कर्मचारी बहिष्कार टाकणार आहे.

भुसावळ व वरणगावचे सर्व कर्मचारी १५ रोजी फैक्टरी पासुन दुर व घरीच थांबतील व टीव्ही प्रसारण बंद ठेवतील असे युनियन, आसोशिएशन संयुक्त समितीचा निर्णय आहे व उपवास करुन विरोध करतील. असे ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लाईज फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेन्द्र झा यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.